Jalgaon Politics news update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP MLA Suresh Bhole : रस्ता दुरुस्ती निधीचा वाद थेट मुखमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात ; आमदार भोळेंची तक्रार..

Jalgaon Politics : ना हरकत प्रमाणपत्र देण्यास महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना कारणे देत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon : जळगाव शहरातील रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी निधी वाटपावरुन भाजपच्या आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी सरकारने दिलेल्या निधीबाबत सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट व भाजप आमदार सुरेश भोळे यांच्यात वाद पेटला आहे, हा वाद थेट मुखमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या दरबारात पोहचला आहे.

महापालिकेत भाजप फोडून शिवसेना ठाकरे गटाने सत्ता स्थापन केली आहे,आता भाजप विरोधी बाकावर आहे. मात्र दुसरीकडे शहरात भाजपचे आमदार आहेत, राज्यात भाजपची सत्ता आहे. आमदार भोळे यांनी महापालिका रस्त्याची कामे करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत शहरातील रस्त्याची कामे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहेत. मात्र हे काम करताना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र लागते, त्यासाठी ठराव करावा लागतो.

ना हरकत प्रमाणपत्र देण्यास महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना कारणे देत आहे. महापालिकेचे म्हणणे आहे की आम्हाला शहरातील कोणत्या रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकम विभाग कोणत्या निधीतून करणार? याची यादी द्या, दुसरीकडे बांधकाम विभागाने मोघम यादी दिल्याचा आरोपही महापौर जयश्री महाजन यांनी केला असून त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. त्यानंतर अधिकारी आता यादी देणार आहेत.

महापालिका रस्त्याच्या कामाचे ना हरकत प्रमाणपत्र देत नाही, म्हणून भाजप आमदार सुरेश भोळे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतची लक्षवेधी विधीमंडळात आणणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने जळगावमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी शंभर कोटी, ८५ कोटी, बेचाळीस कोटी असे निधी जाहीर केले आहेत. त्यातील ४२ कोटी रुपयांच्या निधीतून कामे सुरू आहेत, तर आमदार भोळे यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारकडून शंभर कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र कोणत्याही निधीतील कामे महापालिका द्वारे न करता ती सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. याच मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT