MP Dhananjay Mahadik : सोलापूर विमान सेवेचा प्रश्न कोल्हापुरच्या खासदारांनी अधिवेशनात मांडला..

Parliament Monsoon Session : कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे ही विमानसेवा सुरू होत नव्हती..
MP Dhananjay Mahadik
MP Dhananjay Mahadiksarkarnama

Mohol : सोलापूर विमान सेवेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. ही विमानसेवा सुरु करण्यास काही बाबींची पूर्तता करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे ही विमान सेवा बंद होती. याच मुद्द्यावरून बुधवारी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापूर विमान सेवेचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी प्रश्नोत्तराच्या तासाला सोलापुरच्या विमानसेवेचा प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले.

MP Dhananjay Mahadik
Nilam Gorhe Vs Gopichand Padalkar News : नीलम गोऱ्हे पडळकरांवर भडकल्या ; आज सभागृहात बोलण्यास बंदी

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मुंबई-हैद्राबाद या महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोलापुरच्या विमान सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी बुधवारी संसदेत केली.

"ज्या साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे ही विमानसेवा सुरू होत नव्हती, न्यायालयाच्या आदेशानुसार ती चिमणी सध्या पाडण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून लवकरात लवकर विमान सेवा सुरू करावी," अशी मागणी महाडिकांनी अधिवेशनात केली.

MP Dhananjay Mahadik
Thackeray ON Election Commission : 'आयोग शिवसेनेची आत्या लागत नाही, शिवसेना नाव माझ्या आजोबांनी दिलयं..

सोलापूर जिल्ह्यात सूत गिरण्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी तयार होणारे टॉवेल, चादर, नॅपकीन यांची जगामध्ये निर्यात केली जाते. देशातील सर्वात मोठ्या कारखान्याचे जाळे सोलापूर जिल्ह्यात आहे. शिवाय डाळिंब, द्राक्ष, याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आहे.

शहरांचा विकास होण्यासाठी रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग याच बरोबर हवाई वाहतूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडली पाहिजेत, हे उद्दिष्ट ठेऊन उडान योजना लागू केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com