Jalgaon rural Vidhan Sabha election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Gramin Vidhan Sabha Election 2024 : 10 वर्षापूर्वीच्या निकालाची आठवण ; एका गुलाबरावांनी दुसऱ्या गुलाबरावांना केलं चीतपट

Gulabrao Deokar Vs Gulabrao Patil Vidhan Sabha Election : 2014 मध्ये गुलाबराव पाटील विजयी झाले होते. आता 10 वर्षांनंतर पुन्हा हे दोघे बडे नेते रिंगणात होते. या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक झाली.

Mangesh Mahale

जळगाव जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर समोरासमोर उभे ठाकले आहेत.

2009 मध्ये दोन्ही गुलाबरावांमध्ये लढत झाली होती. त्यात देवकरांनी पाटलांना धुळ चारली होती. आता दहा वर्षांनी पुन्हा एका गुलाबरावांनी दुसऱ्या गुलाबरावांचा पराभव केला आहे. पाटलांना १४ हजार ४०८ मते मिळाली आहेत, तर देवकर यांना ८ हजार १७६ मते मिळाली आहेत. सुमारे ६० हजार मतांनी गुलाबराव पाटलांचा विजय झाला आहे.

2014 मध्ये गुलाबराव पाटील विजयी झाले होते. आता 10 वर्षांनंतर पुन्हा हे दोघे बडे नेते रिंगणात होते. या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक झाली. विजयी उमेदवाराला मंत्रीपद मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून जळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे पाहिले जाते.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात होते. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या विरोधकांना मोठ्या फरकाने हरवून दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला होता. त्यांचा विरोधात चंद्रशेखर प्रकाश अत्तराडे हे अपक्ष उमेदवार होते.

अत्तराडे चंद्रशेखर प्रकाश यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ५९,०६६ मते मिळवली. पण गुलाबराव पाटील यांनी १,०५,७९५ मते मिळवून मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाटील यांना अत्तराडे चंद्रशेखर प्रकाश यांच्यापेक्षा ४६,७२९ मते जास्त मिळाली होती.

2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. त्यांना कृषी, परिवहन राज्यमंत्री पद मिळाले होते. 2014 च्या निवडणुकीत गुलाबराव पाटील हे निवडून आले होते. त्यांना सहकार राज्यमंत्री आणि त्यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळाले आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात पाटील समाजाचा प्रचंड प्रभाव आहे. या विधानसभा मतदारसंघात २५ टक्के मतदार पाटील समाजाचे आहेत. मुस्लिम समाजाचे ८.५ टक्के, तसेच कोळी, सोनवणे आणि चौधरी समाजाचेही मोठे प्रमाण आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाटील समाजाचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे.

महायुतीचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील रावेर आणि अमळनेर हे दोन मतदारसंघ वगळता 9 जागा महायुतीचे पटकावल्या होत्या.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मधून भाजपच्या रक्षा खडसे तर जळगावमधून स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाततून 60 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT