Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : न्यायालयात डोक्यात पंखा पडून आरोपी जखमी, संतप्त वकिल संघ थेट गिरीश महाजनांच्या भेटीला..

After a ceiling fan fell on an accused at Jamner Court in Jalgaon, lawyers met Girish Mahajan demanding a new court building : जळगाव जिल्ह्यातील जामनेर न्यायालयात साक्ष सुरू असतानाच आरोपीच्या डोक्यात पंखा पडल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या घटनेत सुदैवाने आरोपीला गंभीर दुखापत झाली नाही, तो थोडक्यात बचावला.

Ganesh Sonawane

Jamner court incident : जळगाव जिल्ह्यातील जामनेर न्यायालयात साक्ष सुरू असतानाच आरोपीच्या डोक्यात पंखा पडल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या घटनेत सुदैवाने आरोपीला गंभीर दुखापत झाली नाही, तो थोडक्यात बचावला. मात्र या घटनेवरून न्यायालयाच्या इमारतीतील असुविधा आणि डागडुजींचा अभाव इत्यादी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर वकिल संघाने रविवारी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. जामनेर न्यायालयाची जुनी इमारत पाडून न्यायालयासाठी नवीन इमारत बांधून मिळावी अशी मागणी वकिल संघाने केली. त्यावर जामनेर न्यायालयाला लवकरच नवीन इमारत मंजूर करु असे आश्वासन मंत्री महाजन यांनी वकिल संघाला दिले आहे.

मंत्री महाजन यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या असून कागदपत्रांच्या पूर्ततेचे आदेश दिले. दरम्यान महिला वकिलांनी काही समस्या महाजन यांच्यापुढे मांडल्या. जामनेर न्यायालयात महिला वकिलांची संख्या दखलपात्र आहे. पंरतु असे असतानाही स्वतंत्र महिला वकील कक्ष नाही. त्यामुळे महिला वकिलांना अनेक अडणींचा सामना करावा लागतो. ही बाब वकिल महिलांनी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. के. पी. बारी, सरकारी वकिल अॅड रुपाली चव्हाण यांच्यासह वकिल संघाचे सदस्य उपस्थित होते.

नेमकं काय घडलं होतं?

जामनेर न्यायालयात धक्कादायक प्रकार घडला. एका गुन्ह्याच्या प्रकरणात संशयित असलेला दिनेश सुरजमल तेली हा न्यायालयीन कामकाजादरम्यान कोर्टरूममध्ये मागच्या बाकावर बसलेला होता. न्यायालयात साक्ष घेण्याचे कामकाज सुरू असताना अचानक छताचा फिरता पंखा निखळून त्याच्या डोक्यात पडला. या घटनेत सुदैवाने पंखा डोक्याच्या भागाकडून पाठीकडे निसटल्याने गंभीर दुखापत टळली. आरोपीचे सुदैवाने प्राण वाचले त्याला गंभीर दुखापत झाली नाही. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कोर्टरूम मध्ये एकच गोंधळ उडाला होता.

लगेचच साक्ष देणारे व वकिल धावत उठले. संबधित आरोपीला तातडीने प्राथमिक उपचारासाठी न्यायालयाजवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी त्याला गंभीर दुखापत न झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरोपीची प्रकृती आता स्थिर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT