Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate
Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate Sarkarnama

Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : 'कर्ज वाटपात चुका मान्य, पण बँक बुडवली असं म्हणू नका' कोकाटेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

Manikrao Kokate responds to Chhagan Bhujbal's allegations on Nashik District Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक संकटात असून या मुद्द्यावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या दोघांत पुन्हा शाब्दिक युद्द रंगले आहे.
Published on

Manikrao Kokate : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक संकटात असून या मुद्द्यावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या दोघांत पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. कधीकाळी भारतात दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणून गणली जाणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक सर्वपक्षीय नेत्यांनी बुडवून टाकली. असा आरोप भुजबळांनी केला होता. त्यांच्या आरोपाला आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोकाटे म्हणाले, जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झाला आहे. बॅंकेच्या निवडणुका घेऊ नये या मताशी मी सुद्दा सहमत आहे. निवडणुका बँकेला परवडणाऱ्या नाहीत.  परंतु सर्वपक्षीय नेत्यांनी बॅंक बुडवली हा आरोप चुकीचा आहे. भुजबळांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. असे काहीही झालेले नाही. कुठल्याही राजकीय नेत्याकडे बँकेचे कर्ज येणे नाही. बँक त्यांनी बुडवली, असे म्हणता येणार नाही. असं प्रत्युत्तर कोकाटे यांनी भुजबळांना दिलं आहे.

कोकाटे पुढे म्हणाले, काही गोष्टीत चुकीचे निर्णय झाले, अनावश्यक कर्ज वाटप झालेले आहे. हे कर्ज वसुल न झाल्याने बॅंक अडचणीत आली. परंतु यातून राजकीय हेतूने आरोप करणे योग्य नाही. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय बॅंक चालावी व प्रशासक असावा अशीच माझीही भूमिका आहे. त्यामुळे फार गैरसमज करण्याचे कारण नाही असं कोकाटे यांनी भुजबळांना सुनावलं आहे.

Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate
Raj Thackeray MNS : मनसेचे तीन दिवसीय गुपित मिशन, 'कपड्यांच्या बॅगा घेऊन येण्याचं सर्वांना फर्मान..

भुजबळांनी नेमके काय आरोप केले होते?

छगन भुजबळ यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेविषयी भाष्य केलं. भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा बँक ही एकेकाळी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. पण, सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली. ज्यांनी बॅंक बुडवली त्यांची मुले, पुढील पिढीच आता पुन्हा बॅंकेवर ताबा मिळवण्यासाठी निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत.

Chhagan-Bhujbal-Manikrao-Kokate
Gulabrao Devkar : घड्याळ हातात घातलं, पण संकट टळलं नाही ! गुलाबराव देवकर 10 कोटींच्या कर्ज प्रकरणात दोषी

कृपा करून बँकेची निवडणूक घेऊ नका. अशाने ती बँक कधीच वरती येऊ शकणार नाही. बॅंक बुडणाऱ्यांच्या नव्हे तर प्रशासकांच्या ताब्यात राहु द्या. मंत्र्यांनी बॅंकेच्या कारभारात हस्तक्षेप करु नये असा अप्रत्यक्ष टोला भुजबळांनी कोकाटे यांना लगावला. तीच माणसं तीच कुटुंबे बॅंकेवर ताबा मिळवण्यासाठी तयार असून बॅंकेची निवडणुक घेतल्यास तोच गोरखधंदा पुन्हा सुरु होईल असा हल्लाबोल भुजबळांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com