
Nashik Politics : नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजप व शिवसेना (शिंदे गट) ने मिळून पुरता पोखरला आहे. एक-एक करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील दिग्गज नेते भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळे अवघे बोटावर मोजण्या इतके म्हणजे केवळ पाच माजी नगरसेवक उबाठात शिल्लक राहिले आहेत.
भाजपला कोणत्याही परिस्थिती नाशिक महापालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यासाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपने अन्य पक्षातील नेत्यांना हेरुन त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा कार्यक्रम राबवला. त्यात खास करुन उबाठाला भाजपने लक्ष केलं. उबाठाचे अनेक मात्तब्बर नेते भाजपने फोडले. त्यामुळे उबाठातील नेत्यांकडून भाजपविरोधात संतप्त भावना बाहेर येऊ लागल्या आहेत.
भाजप हे फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडून पैशांच्या जोरावर सत्तेत आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या पक्षफोड्या भाजपला धडा शिकवायचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावं असं आवाहन उबाठाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी केले आहे. तसेच सर्वाच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, मात्र या निवडणुका घेण्यासाठी भाजप टाळाटाळ करत असल्याचे गायकवाड म्हणाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सिडको भागात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
गाडकवाड म्हणाले, मोदी सरकार २२ कोटी तरुणांना नोकऱ्या देणार होते. मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही. भाजपकडून फक्त खोटी आश्वासने दिली जात असून दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. भाजपचे हे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारीला लागावे. पक्ष फोड्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहायचे नाही असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी निवड केली होती. बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी गायकवाड यांच्याकडेच फोन करुन दिला होता. दत्ता गायकवाड हे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाचा कार्यभार होता. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.