Gulabrao Patil, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election News : एकनाथ शिंदेंचा आदेश? मंत्र्याच्या मुलासाठी संपूर्ण शिवसेना एकवटली,कोणाचा गेम होणार?

Jalgaon Legislative Council election News : मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी भाजप आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर सोमवारी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली.

सरकारनामा ब्युरो

Jalgaon News : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घडामोडीला वेग आला असतानाच महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामध्ये जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून भाजप व एक्सनाथ शिंदे यांची शिवसेना समोरासमोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी भाजप आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर सोमवारी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली. या बैठकीत नेमके काय प्लॅनिंग करण्यात आले याची चर्चा रंगली आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जागावाटपात जळगावची जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे ठरलेले नाही. दुसरीकडे मात्र भाजप (BJP) व शिंदे शिवसेनेत या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी मुंबईवरून परतल्यानंतर जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली. या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही.

जळगावची जागा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जागेवरून ते आपल्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळेच आता भाजपा आणि शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असताना आता जळगावात झालेली ही गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

याआधी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी जामनेरमध्ये भाजप आमदार तसेच खासदारांच्या सोबत भाजपची एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर आता आज मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेना (Shivsena) आमदारांची बैठक पार पडली आहे. मुंबईहून जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील थेट आमदारांसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत.

जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेने दावा केला असून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली जात आहे. विधान परिषदेतील निवडणुकीतील रणनीती संदर्भात तसेच उमेदवारी व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेची ही तातडीची बैठक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या बैठकीत सेना आमदारांनी गुप्त प्लॅनिंग करीत नेमका कोणाचा गेम करणार याची चर्चा रंगली आहे.

SCROLL FOR NEXT