MP Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Loksabha Constituency : उन्मेश पाटलांना पक्षांतर्गत वादाचा बसला फटका?

MP Unmesh Patil : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत उन्मेश पाटील यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून आले.

कैलास शिंदे

Jalgaon BJP Politics News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्रामधील 20 मतदारसंघातील उमेदवारांची नावे आहेत. तर, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांना पक्षांतर्गत वाद व काही प्रमाणात कमी असलेल्या जनसंपर्क यामुळे भाजपची उमेदवारी न मिळण्याचा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.

उन्मेश पाटील यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात(BJP) प्रवेश केला त्यानंतर त्यांना चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांचा पराभव करून आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला.त्यांनी आपल्या आमदारकीचा चांगला प्रभाव पडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढे 2019 मध्ये त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची कोणतीही तयारी नव्हती, ते उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हते,मात्र विद्यमान खासदार ए. टी.पाटील यांची उमेदवारी रद्द करून तत्कालीन आमदार स्मिता वाघ याना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ऐनवेळी त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली आणि चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील(Unmesh Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. पक्ष नेतृत्वाने दिलेली उमेदवारी स्वीकारून त्यांनी जोरदार प्रचार केला आणि विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले.

खासदार म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना हात घातला.जळगाव विमानतळावरून प्रवासी विमान सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले. मात्र ही सेवा बंद पडली,आता सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. गिरणा नदीच्या जलसंपदासाठी त्यांनी गिरना नदी काठच्या गावावरून पदयात्रा काढली, नदीवर तीन बलून बंधारे मंजूर करून आणले परंतु त्याचे काम होवू शकले नाही.

जळगाव एम आय डी सी वाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, पाडलसरे धरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कामे करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीसा त्यांचा जनसंपर्क कमी पडला तर पक्षांतर्गत वादही असल्याचे दिसून आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांचा संघर्ष जिल्ह्याला माहीत आहे. या सर्वाचा परिणाम उन्मेश पाटील यांना दुसऱ्यांदा उमदेवारी न मिळण्यात झाली असल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT