Jalgaon News : खानदेशातील चार पैकी तीन खासदार कायम; उन्मेश पाटलांचा पत्ता कापला

Raksha Khadse राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत एकनाथ खडसे भाजपमध्ये होते, मात्र त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
Raksha Khadse, Heena Gavit, Shubhash Bhamre
Raksha Khadse, Heena Gavit, Shubhash Bhamresarkarnama

Jalgaon News : खानदेशातील नंदुरबार, धुळे व रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदारांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कापण्यात आला आहे. रावेर मध्ये एकनाथ खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी कायम ठेवली आहे.

खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार व रावेर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यात धुळे येथील सुभाष भामरे, नंदुरबार येथील हिना गावित व रावेर येथील रक्षा निखील खडसे यांची ही तिसरी टर्म आहे. धुळे येथील सुभाष भामरे व रावेर येथील रक्षा खडसे यांची उमेदवारी यावेळी मिळणार नसल्याचे सांगितले जात होते.

धुळे येथील सुभाष भामरे Subhash Bhamre यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले होते, त्यामुळे त्यांची उमेदवारीही जाणार असे सांगण्यात येत होते. मात्र, पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास कायम ठेवून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबारमधून हिना गावित याना भाजपतर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती, त्यानुसार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

Raksha Khadse, Heena Gavit, Shubhash Bhamre
Jalgaon Politics : ‘गिरीशभाऊ, तुम्ही दिल्लीला जा’; गुलाबरावांच्या कोटीला महाजनांचे उत्तर ‘का आमच्या जिवावर उठता?’

रक्षा खडसेनाही तिसऱ्यांदा संधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत एकनाथ खडसे भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणूक झाल्यावर त्यांनी भाजपचा राजीनामा देवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षातर्फे त्यांना विधानपरिषदेवर आमदारीकिही देण्यात आली होती. खडसेंच्या पक्षांतरामुळे श्रीमती रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. सासरे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतांनाही भाजपने श्रीमती रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे.

जळगावातून पाटलांचा पत्ता कापला

जळगाव लोकसभा मतदार संघात उन्मेश पाटील यांना दुसऱ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. त्यांची उमेदवारी कापण्यात आली असून त्यांच्या ऐवजी माजी आमदार व मागच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करूनही उमेदवारी रद्द झालेल्या श्रीमती स्मिता वाघ यांना यावेळी संधी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raksha Khadse, Heena Gavit, Shubhash Bhamre
रक्षा खडसेंनीही खासदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी थोपटले दंड | Raksha Khadse On Eknath Khadse

जळगाव जिल्हयात दोन्ही महिला

जळगाव जिल्ह्यात जळगाव मतदार संघात स्मिता वाघ व रावेर मतदार संघात श्रीमती रक्षा खडसे यांना उमेदवारी देवून भाजपने जिल्हयात महिलांना संधी दिली आहे.

Edited By : Umesh Bambare

Raksha Khadse, Heena Gavit, Shubhash Bhamre
Amit Shah Live: जळगावातून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी फोडला प्रचाराचा नारळ | Jalgaon |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com