Karan Pawar, Smita Wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Loksabha News : जळगावात मतांचा टक्का वाढला; सत्ताधाऱ्यांना ठरणार घातक..?

Umesh Bambare-Patil

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी यावेळेस सकाळ दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. विशेषत: मध्यमवर्गीय भागात मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या. गेल्या दोन पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत असा प्रतिसाद दिसून आला नव्हता. जळगाव लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंत झालेले ३२ टक्के मतदान सत्ताधारी पक्षाला घातक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. येथे उद्धव ठाकरेंचे उमेदवार करण पवार, भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत आहे. सकाळपासूनच या मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा पहायला मिळत आहेत. दुपारपर्यंत या मतदार ३२ टक्के मतदान झालेले आहे. जळगाव शहरात मध्यमवर्गीय भागातून मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्याचे दिसत आहे.

हा वर्ग साधारणपणे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असणारा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांना आतापर्यंत दिलासा मिळत असल्याचे दिसत असला तरी भाजपलाही काही भागात चांगला प्रतिसाद आहे. जळगाव ग्रामीण हा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी तब्बल ३४ टकके मतदान झाले आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी भाजपच्या स्मिता वाघ यांना कल असू शकतो. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचा एरंडोल पारोळा मतदारसंघ आहे. या ठिकाणी आतापर्यंत ३५ टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी श्री.पवार याची मशाल प्रखर उजेड पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत टक्केवारी वरून संमिश्र स्थिती दिसत असली तरी किंचित महाविकास आघाडीकडे कल असल्याचे दिसत आहे. परंतु सायंकाळी अंतिम टक्केवारी वरूनच खरा अंदाज व्यक्त करता येणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT