Jalgaon Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Mahapalika News: सत्ताधारी भाजपवर आली आंदोलनाची वेळ; नव्या वादाला प्रारंभ

Jalgaon Municipal Corporation BJP protest : कचरा स्थानांतरण केंद्रामुळे नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. पाच हजार लोकवस्तीच्या या भागात महापालिकेच्या या निर्णयाला विरोध सुरू झाला. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला.

Sampat Devgire

Jalgaon BJP News: जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने १०० टक्के जागा जिंकल्या. महापौरापासून तर सर्वच कारभारी भाजपचे आहेत. मात्र त्यातून एक विचित्र स्थिती पाहायला मिळाली.

नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मदतीने महायुती म्हणून जळगाव महापालिकेत सत्ता आली. सर्व सूत्रे महायुतीच्या हाती आली आहेत.

जळगाव महापालिकेत विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मोजके नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेत भाजप हवे तसे निर्णय घेण्यास मोकळी आहे. भाजपने शहरातील कचरा स्थानांतरण डेपो उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यातून एका नव्या वादाला प्रारंभ झाला आहे.

सम्राट कॉलनी आणि टीएम नगर येथे कचरा स्थानांतरण केंद्र उभारले जाणार आहे. भाजपच्या नगरसेवकांनीच हा निर्णय घेतला. त्यासाठी ८.९८ कोटींचा निधीही मंजूर केला. निविदाही सोयीच्या कंत्राट दाराला मंजूर झाली.

मात्र ज्या भागात कचरा स्थानांतरण केंद्र उभारले जाणार आहे तेथील नगरसेवक देखील भाजपचेच आहेत. कचरा स्थानांतरण केंद्रामुळे नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. पाच हजार लोकवस्तीच्या या भागात महापालिकेच्या या निर्णयाला विरोध सुरू झाला. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला.

नागरिकांमध्ये असंतोष विचारात घेऊन या प्रश्नावर शुक्रवारी आंदोलन झाले. आपलिकेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये चक्क अरविंद देशमुख, प्रकाश बालानी, अनिल भडकमोल, रेश्मा काळे, चेतन शिरसाळे हे भाजपचेच नगरसेवक आघाडीवर होते. सत्ताधारी आणि निर्णय घेणारे भाजप आणि आंदोलन करणारे विभाजक अशी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली.

यावेळी आयुक्त ज्ञानेश्वरी आणि सह आयुक्त उदय पाटील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेले. मात्र आंदोलन नगरसेवक अधिकाऱ्यांना निवेदन देण्याऐवजी माध्यमांची या निर्णयाविरोधात तावातावाने आपली भूमिका मांडण्यात व्यस्त दिसले. शेवटी कंटाळून आयुक्त माघारी फिरले. तेव्हा ही कोंडी फोडण्यासाठी महापौर आणि उपमहापौर्यांना पुढाकार घ्यावा लागला.

महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी आंदोलकांना शांत केले. लोकांच्या मागण्यांचा व लोकभावनेंचा विचार करू, असे सांगत आंदोलकांची समजूत घातली. त्यानंतर हे आंदोलन निवळले. मात्र महापालिकेत तो चर्चेचा विषय ठरला. ज्यांना निवडून दिले त्यांनाच आंदोलन करण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्येही गोंधळाची स्थिती दिसली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT