Jalgaon BJP News: जळगाव महापालिकेत कचऱ्याचे राजकारण नवे नाही. मात्र आता भाजप आमदार आणि महापौरांनी थेट आयुक्तांना टार्गेट केले आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपची पहिलीच महासभा आयुक्त विरुद्ध सत्ताधारी, अशा संघर्षामुळे चर्चेत आली.
आता या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी थेट आयुक्तांनाच टार्गेट केले आहे. बीव्हीजी कंपनीला काम करू दिले जात नसून वॉटर ग्रेस या कंपनीला मागच्या दाराने पुन्हा महापालिकेत आणण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
जळगाव महापालिकेत वॉटरग्रेस ही कचरा उचलणारी कंपनी नेहमीच वादात राहिली आहे. तिचा संबंध थेट सत्ताधारी पक्षाशी जोडला गेला होता. आता याच कंपनीवरून नव्याने वाद उफाळला आहे.
यासंदर्भात आमदार भोळे यांनी थेट आयुक्तांवर तिखट शब्दात हल्ला केला आहे. बीव्हीजी कंपनीच्या बाजूने आमदार उभे राहिले. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे यावेळी महापौर दीपमाला काळे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांसह विविध नेते उपस्थित होते. त्यामुळे हा वाद राजकीय दृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
आमदारांची ही काळजी शहरातील नागरिकांसाठी की कचरा उचलणाऱ्या बीव्हीजी कंपनीसाठी हा चर्चेचा विषय आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी तेवढेच खंबीर होत उत्तर दिले आहे. बीव्हीजी कंपनीच्या कार्यपद्धतीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शहरात पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी कचरा संकलनातील अडचणींवर लक्ष केंद्रित केले होते. आयुक्तांनी शहरात दाखल होताच बंद पद्धती आणि बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलनाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला होता.
वॉटरग्रेस आणि बीव्हीजी कंपन्यातील कचरा उचलण्याची स्पर्धा आणि त्यातील काळेबेरे पुन्हा एकदा लोकांपुढे आले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या या राजकारणातही लोकांना कचऱ्यापेक्षा अधिक दडलेले अर्थकारण आणि राजकारणाचा दिसून येत आहे.
शहरातील कचरा नियमित उचलला जाणे, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे आणि स्वच्छता व्यवस्थेचे काम सुरळीत चालणे या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी आहेत. मात्र, या मूलभूत प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी जळगाव महापालिकेत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.