Madhusudan Kendre : डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी, आमदार रत्नाकर गुट्टेंसह चौघांविरुद्ध पोलीसात तक्रार; मधूसुदन केंद्रे आक्रमक

Gangakhed Politics News: गंगाखेडमध्ये माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. नाली बांधकामाच्या वादातून दोन्ही गटांतील संघर्ष वाढला आहे.
Madhusudan Kendre,Ratnakar Gutte
Madhusudan Kendre,Ratnakar GutteSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gangakhed Politics: गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डाॅ. मधूसुदन केंद्रे आणि रासपचे विद्यमान आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय वैर अधून मधून उफाळून येत असते. यातच आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नाली बांधकामाच्या वादातून नगरसेवक अॅड. मिथिलेश केंद्रे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यावरून केंद्रे-गुट्टे गटात वादाचा भडका उडाला असतानाच आता मधुसूदन केंद्रे यांनी थेट आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात गंगाखेड पोलीसांकडे तक्रार केली आहे.

शहरात गेल्या काही दिवसापासून गुट्टे-केंद्र गटात वादावादी सुरू आहे. पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या दोन परस्परविरोधी घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध मध्यरात्री घरी येऊन डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार शनिवारी (ता.१७) दिली.

शहरातील ओमनगर परिसरात गुरुवारी (ता.१५) दुपारी दोन वाजता नाली बांधकामावरून वाद झाला होता. याप्रकरणी राजाभाऊ किशनराव कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत, नाली बांधकामाच्या कारणावरून नगरसेवक ॲड. मिथिलेश मधुसूदन केंद्रे, सुभाष मुंढे, योगेश मुंढे आणि अजित शिगनाजी घोबाळे यांनी शिवीगाळ केली.

तसेच मिथिलेश केंद्रे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.१६) गंगाखेड पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिथिलेश केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे समर्थकांसह गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले.

Madhusudan Kendre,Ratnakar Gutte
Maharashtra Politic's : महायुतीत वाद पेटला; भाजप उमेदवाराने शंभूराज देसाईंची भेट टाळली, पालकमंत्री तातडीने सांगली दौऱ्यावर रवाना...

दिलेल्या तक्रारीत, शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्री १२ ते १२.४५ दरम्यान आमदार रत्नाकर गुट्टे चार साथीदारांसह वाहनातून त्यांच्या घरी आले. नगरपालिका कर्मचाऱ्याला तक्रार देण्यास का सांगितले, अशी विचारणा करीत वाद घातला. यावेळी गुट्टे यांनी आपल्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील वॉचमन आणि इतरांनी आरडाओरड केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेले. यावेळी वाचलास, पण पुढे तूला सोडणार नाही, मी आमदार आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देऊन आमदार गाडीतून निघून गेले, अशी तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली नाही.

Madhusudan Kendre,Ratnakar Gutte
Sahar Shaikh : 'शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी नाही, एमआयएमप्रमाणे धर्मनिरपेक्ष', 'कैसा हराया' फेम सहर शेखचे मोठे वक्तव्य

गंगाखेड शहरात या दोन राजकीय नेत्यांमधील वादाने वातावरण तापले असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दोन्ही प्रकरणांतील आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com