Jalgaon municipal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : जळगाव महापालिका निवडणूक लढवलेले 16 उमेदवार अडचणीत; 3 वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता

Jalgaon municipal election : जळगावातील विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या १६ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जळगाव महापालिका निवडणूक लढवलेल्या १६ उमेदवारांनी निर्धारित कालावधीत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. संबंधित उमेदवारांविरोधातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा संपूर्ण हिशोब ठरलेल्या मुदतीत निवडणूक खर्च तपासणी कक्षाकडे सादर करणे बंधनकारक असते. परंतु महापालिका निवडणुकीत एकूण २४ उमेदवारांनी वेळेत खर्चाचा तपशील सादर केला नव्हता. यानंतर प्रशासनाने संबंधित उमेदवारांना नोटीस बजावून शेवटची संधी दिली होती. नोटीस मिळाल्यानंतर ८ उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील सादर केला.

परंतु उर्वरित १६ उमेदवारांनी अद्यापही कोणतीही माहिती प्रशासनाकडे जमा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातील अहवाल आता विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या उमेदवारांवर निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील 3 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

या उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार

खर्चाचा तपशील न सादर करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष निवडणूक लढवलेल्या उमेदवारांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, स्वराज्य शक्ती सेना आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

यामध्ये माजी नगरसेविका प्रिया मधुकर जोहरे, वृषाली अर्जुन भारुळे, अनिल रमेशचंद्र पगारिया, मंदा छोटूलाल सोनवणे, कौशल्याबाई उत्तम निकम, पद्माकर देवचंद सोनवणे, कलाबाई नारायण शिरसाठ, छाया फकिरा अडकमोल, चेतन नाना सोनवणे, शेख अहमद नूर लतीफ, जया रघुनाथ साळुंखे, डॉ. किशोर पी. माळी, सोनम रोहिदास सोनवणे आणि अमोल रवींद्र चौधरी यांचा समावेश आहे.

महापालिका निवडणुकीनंतर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोबावरून प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार खर्चाचा तपशील वेळेत सादर करणे बंधनकारक असतानाही अनेक उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. प्रशासनाने नोटीस देऊन अंतिम संधी दिल्यानंतर काही उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर केला असला, तरी अद्यापही अनेकांनी नियमांचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT