Suresh Bhole, Eknath Khadse  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : एकनाथ खडसेंनी आमदार सुरेश भोळेंच्या जखमेवर चोळलं 'मीठ' म्हणाले, ज्याला पाईप चोर म्हटलं, पुरावे दिले..

Eknath Khadse On Suresh Bhole MLA BJP : जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका ठिकाणी भाषण करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जळगावमध्ये ज्यांच्यावर आमदार सुरेश भोळे यांनी पाईप चोरीचा आरोप केला..ज्यांना पाईप चोर म्हटलं.. ज्यांच्या विरोधात पुरावे दिले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं आज त्याच उमेदवारांचा आमदार सुरेश भोळे यांना प्रचार करावा लागतो आहे. आमदार सुरेश भोळे तुमची कीव करावीशी वाटते असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या जखमेवर मीठ चोळलं.

जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली व गंभीर आरोप केले. ज्या लोकांवर गुन्हा आहे अशा व्यक्तींना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आहे, कुणी पाईप चोर आहे. कुणी जेलमधून निवडणूक लढवत आहे असा टोला खडसेंनी लगावला.

भाजपने आयारामांना दिलेलं महत्व पाहाता त्यावर एकनाथ खडसेंनी नेम धरला व भाजपच्या निष्ठावंतांना चुचकारलं. जुन्या जाणत्या नेत्यांवर कुणाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हे त्यांचं दुर्देव असल्याची खंत खडसेंनी व्यक्त केली. आजवर जे भाजपच्या विरोधात होते किंवा ज्यांचा भाजपने विरोध केला तेच आज माजी नगरसेवक आज भाजपत आहेत त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे.

गुंडागर्दी करुन नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. सातत्याने सर्वसामान्य माणसाला विकत घेण्याची भाषा महायुतीच्या माध्यमातून केली जात आहे. परिवर्तन फक्त मतदारच करू शकतो आणि ही तुम्हाला शेवटची संधी आहे. परिवर्तनासाठी प्रयत्न केलेच पाहिजे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

खडसे पुढे म्हणाले, माझे अर्धे आयुष्य भाजपमध्ये गेले. पण त्या कालखंडात एमआयएम सोबत भाजपची युती कधी नव्हती. इकडे भांडतात आणि तिकडे एमआयएम सोबत युती करतात अशी आजची स्थीत आहे. इकडे बघितलं तर सकाळी-सकाळी काँग्रेस सोबत भांडतात आणि तिकडे अंबरनाथ मध्ये पाहिलं तर काँग्रेस सोबत युती करतात. काँग्रेसचे 12 नगरसेवक एका रात्रीत भाजपने फोडले. तर काय म्हणे सरकार बनवायचे. मुंबई असेल ठाणे, नाशिक असेल या सगळ्या महानगरपालिकांमधील चित्र काय आहे. निष्ठांवंत कुठे गेले? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.

दरम्यान आत्ताच्या आणि पूर्वीच्या भाजपमधील फरक स्पष्ट करताना त्यांनी भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचे उदाहरण दिले. खडसे म्हणाले, मुंडे साहेबांनी राजकारणात असताना गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करु अशी घोषणा केली. दाऊदसह सगळ्यांची गुंडगिरी त्यांनी मोडून काढली. परंतु आज काय परिस्थिती आहे. भाजपने शेकडो गुंडांना महाराष्ट्रात उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला. आज तुम्ही ज्या लोकांना प्रतिसाद देऊन राहिले ज्यांना मोठं करताय. निवडून आल्यावर ते लोक काय करणार आहे तर गुंडगिरी करणार आहे. टेंडर खाण्यासाठी मलिदा खाण्यासाठी महायुतीला महापालिका पाहिजे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT