

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडी देखील स्वबळावर उतरली आहे. वंचितने स्वबळावर ५५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. विशेष करुन त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना निशाण्यावर घेतलं.
आंबेडकर यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख व मंत्री गिरीश महाजन यांच्यावरच पहिलं घाव घातला. गिरीश महाजन यांनी आपले उत्पन्न लपवल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांनी आयकर विभागाला केवळ ११०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडे १२ हजार कोटींची संपत्ती असून, त्यांनी १० हजार कोटी लपवले असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. निवडणुकीनंतर महाजनांपासूनच बेनामी संपत्ती असलेल्यांचा हिशेब मांडण्यास सुरवात करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मोदींवर देखील टीकास्र सोडलं. मोदी म्हणतात मैने तो खाया नही. अरे तु दुसऱ्याला खायला सांगितलं आणि त्यातला वाटा घेतला ना. मग एकच झालं ना. भारतीय जनता पक्षाचा पक्षाचं सरकार सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं सरकार आहे. मी कॉंग्रेसवाल्यांना नेहमी म्हणतो ते बुरटे चोर आहेत. ते बुरटे चोर होते. ते बुरटे चोर आपल्याला चालतात तांदूळ, गहू..खायला घेऊन जातात. पण हे सगळं असेल नसेल ते घेऊन जातात असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.
भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूचे सरकार आहे. इलेक्शन संपलं की माझा एक कार्यक्रम सुरु होणार आहे. तुम्ही साथ देणार असाल तर सांगतो..या सगळ्यांच्या बेनाम्या प्रॉपर्टीस् मला माहित आहे. आता मी एकटा त्या सगळ्या बेनामी प्रॉपर्ट्यांमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही जर साथ दिली तर तुमच्या नावावर मी त्या बेनामी प्रॉपर्टी मी करुन देतो अशी साद त्यांनी उपस्थितीत श्रोत्यांना घातली.
आंबेडकर पुढे म्हणाले, गिरीश महाजन आम्ही तुझ्यापासून सुरुवात करतो. तुम्ही १२ कोटींचे मालक आहात याची आम्हाला माहिती आहे. इनकम टॅक्सला तुम्ही फक्त अकराशे कोटी तुम्ही दाखवले आहेत. १२ हजारातून अकराशे कोटी वजा केले तर किती शिल्लक राहतात? दहा हजार कोटीचं तुम्हाला मालक व्हायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. फक्त पळून जाऊ नका, नाहीतर मी एकटाच तिथं उभा असं नको व्हायला. मी तुमची हिम्मत बघणार आहे असं आंबेडकर म्हणाले.
या निवडणुकीत आता गाड्यांनी पैसे वाटले जाणार आहेत. पोलिस आपले मित्र आहेत. त्यांना कानात जाऊन जागा मी धाड घालतो अर्धे तुझे-अर्धे माझे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. कारण हे पोलिसाकडे जाऊ शकत नाही. कारण पोलिस विचारतील हे आणले कुठुन ते आधी सांग. आता हा काळा पैसा आहे, दाखवू शकत नाही, त्यामुळे यांची मजबुरी आपला आनंद आपण समजायचं. यांची मजबुरी पैसे वाटण्याची आहे. आणि आपण ठरवायचं यांना लुटलं हा आपला आनंद आहे. त्यांच्याकडे पैसे वाटण्याची कला आहे तर आपल्याकडे तो पैसा लुटण्याची कला असली पाहीजे हे लक्षात घ्या असं अॅड. आंबेडकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.