Rohini Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohini Khadse Politics: रोहिणी खडसेंचा भाजपला टोला; ‘त्या’ सत्ताधारी आमदारांना गॅसचे महत्व कळते का?

Jalgaon NCP Sharad Pawar leader Rohini Khadse BJP MLA criticizes gas shortage-केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभाराने उज्ज्वला योजनेची किंमत शूण्य झाली, महिलांवर पुन्हा चूल पेटवण्याची वेळ आली!

Sampat Devgire

Gas shortage news: इराण अमेरिका युद्धामुळे देशात समस्या जाणवू लागल्या आहेत. विशेषता स्वयंपाकाच्या गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. संदर्भात रोज नव्या बातम्या येत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनी स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई नसल्याचे वक्तव्य केले आहे. भाजपच्या महिला आमदारांनी २५ दिवसात गॅस सिलेंडर मिळणार असे विधान केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या या विधानांचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी घेतला आहे. 

रोहिणी खडसे यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला. भाजप आणि विशेषता सत्ताधारी आमदार असल्याने या महिलेला स्वयंपाकाच्या असे महत्त्व कळत नसावे. त्यामुळेच अशी बेलगाम वक्तव्य केली जात आहेत. 

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून उज्वला योजना राबवली. योजनेत महिलांना स्वयंपाकाचा गॅस देण्यात आल्याचा डांगोरा पिटला. मात्र आज स्थिती गंभीर वळणावर येऊन पोहोचली आहे. 

उज्वला गॅस योजनेचा प्रभाव संपुष्टात आला आहे. दृष्टीने ही योजना कुचकामी ठरली आहे. पुन्हा एकदा महिला अडचणीत आल्या असून गॅस टंचाईचा फटका बसला आहे. 

केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभाराने इराण युद्धाचा मोठा फटका भारतातील महिलांना बसला आहे. पुन्हा एकदा त्यांना चुली पेटविण्याची वेळ आणली आहे. सरकारच्या या धोरणाने महिलांवर पुन्हा एकदा चुलीपुढे बसून डोळ्यातून अश्रू ढाळण्याची वेळ या सरकारने आणली, असा ठपका खडसे यांनी भाजपवर ठेवला.  

उज्वला योजनेची जाहिरात करून सरकारने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. आता सरकारच्या नियोजन शून्य कारभाराने या योजनेची किंमत शून्य झाली आहे. सरकारने प्रसिद्धीचा हव्यास सोडला पाहिजे. तातडीने कामाला लागून महिलांना गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT