Jalgaon News : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकाराची माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्या ३६ वर्षीय विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून गुन्हा दाखल होण्यासाठी आमदार चव्हाण पोलिस ठाण्यात पाच तास ठिय्या मांडून बसले. परंतु महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक पाटील यांच्यावर केलेले सगळे आरोप हवेत विरले.
शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर महिलेला लग्नाचे आमिष देऊन तीचे लैगिंक शोषण केल्याचे आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्या महिलेने जर आमदाराकडे म्हणजे माझ्याकडे तक्रार केली तर तिला व तीच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत असून मला देखील गोळी घालून ठार मारण्याची धमकी संदीप पाटील याने दिल्याचा आरोप करत तशी कॉल रेकॉर्डिंग भर बैठकीत आमदार चव्हाण यांनी उपस्थितांना ऐकवली होती.
जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर तत्काळ आमदार चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा मी पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यासाठी चार ते पाच ते पोलिस ठाण्यात ठिय्या देऊन होते. अशात निरीक्षक संदीप पाटील स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले.त्यांनी यावेळी स्वत:ची बाजू मांडली. इतकच काय तर मला अटक करा असेही ते म्हणाले. दरम्यान आमदार चव्हाण यांनीही त्यांची बाजू मांडताना घडला प्रकार सांगितला. मात्र, संबंधित महिलेने घटनाक्रम सांगत तक्रार लिहून घेताना ऐनवेळी नकार दिला. यावेळी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण यांनी केला. पण, मी उद्या घरच्यांना विचारुन मग तक्रार देण्यास येईल असे सांगून महिला निघून गेली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ३०) पोलिसांनी महिलेची वाट पाहिली. पोलिसांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी यावे म्हणून संबधित महिलेला निरोपही पाठवला. रात्री साडेआठपर्यंत एमआयडीसी पोलिस ठाणे महिलेची वाट पाहत होते. परंतु तीने मला तक्रार द्यायची नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांना कळवले.
दुसरीकडे गुन्हे शाखेतून पायउतार झालेले संदीप पाटील आजारपणाच्या रजेवर निघून गेले आहेत. तर एखाद्या तक्रारदाराने तक्रार देण्यास नकार दिला तर पोलिस तिला मदत करू शकत नाही. संबंधित महिलेने जर तक्रार दिली तरच गुन्हा दाखल होईल असे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.