Jalgaon APMC : उद्धव ठाकरेंचा शिलेदार महायुतीच्या नेत्यांना पुरुन उरला, जळगाव बाजार समितीचं सभापती पद राखलं

Jalgaon APMC election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महायुतीचे सगळे प्रयत्न हाणून पाडत जळगाव बाजार समितीचं सभापती पद राखलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या.
Uddhav Thackeray Jalgaon APMC
Uddhav Thackeray Jalgaon APMCSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon APMC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकारण तापलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सभापतीपदावरुन मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महायुतीला जोरदार धक्का देत सभापती पद खेचून आणलं आहे.

उद्धव ठाकरे गटाचे सुनील महाजन सभापतिपदी विजयी झाले. तर उपसभापतिपदी महायुतीचे एकमेव गोकुळ चव्हाण यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, निवडीच्या सभेला मावळते सभापती श्यामकांत सानवणे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला.

जळगाव बाजार समितीत राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट व भाजप मिळून महायुतीचा सभापती करण्यासाठी रणनिती आखत होते. सभापती पदासाठी ठरल्याप्रमाणे एका वर्षासाठी मुदत असताना दोन वर्षे उलटूनही राजीनामा न दिल्याने बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे यांच्यावर १४ संचालकांनी अविश्वास आणला होता. हे सर्व संचालक सहलीवर रवाना झाले होते. मात्र अविश्वासाला सामोरे जाण्याआधी सोनवणे यांनी राजीनामा देऊन टाकला.

Uddhav Thackeray Jalgaon APMC
Jalgaon News : भाजप आमदाराचा स्फोटक आरोप : पोलिस निरीक्षकाकडून महिलेचे लैगिंक शोषण, तक्रार केली तर गोळी घालण्याची धमकी

सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर निवडप्रक्रियेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निवड प्रक्रियेत सभापतिपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी व लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांनी अर्ज दाखल केले. यात सभापतिपदासाठी मनोज चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सभापती पदासाठी सुनील महाजन विरुद्ध लक्ष्मण पाटील असा सामना झाला. त्यात हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये महाजन यांच्यासाठी तब्बल १५ जणांनी हात वर करत मतदान केले. तर लक्ष्मण पाटील यांना अवघी दोन मते मिळाली. त्यामुळे सभापती पदाची माळ सुनिल महाजन यांच्या गळ्यात पडली. तर उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

Uddhav Thackeray Jalgaon APMC
Uddhav Thackeray : CM फडणवीसांना त्यांच्याच डावाने उत्तर देणार : आता उद्धव ठाकरेही फोन फिरवणार!

शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करु, शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन नवनिर्वाचित सभापती सुनिल महाजन यांनी दिले. सुरेशदादा जैन यांच्या कट्टर कार्यकर्त्याला सभापतिपदाची संधी मिळाल्याचं ते म्हणाले. संचालकांनी विश्वास टाकल्याने व दोन्ही मंत्री, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या आशिर्वादाने सभापती झालो असे महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com