Jalgaon News : पोलिसांच्या नजरेसमोर आरोपी बेड्यांसकट पळ काढतात, सायरन वाजतो, गाड्या धावतात असा सीन आपण अनेक चित्रपटांमधून बघत आलो आहे. जळगावात अशी रिअल घटना घडली आहे. गुरे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोन चोरट्यांनी पोलिस वाहनातून बेड्यांसह पळ काढल्याची घटना घडली.
बेड्या घातलेले संशयित पळून जाईपर्यंत पोलिस काय करत होते असा साहजिकच प्रश्न पडतो. त्यामुळेच निष्काळजीपणा व कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत चौकशीअंती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील चार पोलिसांवर एकाचवेळी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी अशा चौघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईने जळगाव पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे जळगावातील गुन्हे शाखेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
बुधवार २२ ऑक्टोबरच्या रात्रीची ही घटना आहे. लोणे आणि पिंपळे (ता. अमळनेर) येथून सात, तर पहूर तालुक्यातून तीन गुरे चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी तपास करत याप्रकरणात चौघांना बेड्या ठोकल्या.
स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी चौघा संशयितांना शासकीय वाहनाने अमळनेरला आणले जात होते. दरम्यान, शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी असे दोघे बेड्या घातलेल्या अवस्थेत असतानाच चांणी कुन्डे अंडरपासजवळ वाहनातून उडी मारत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. इतर दोन संशयितांना घेऊन पोलिस अमळनेर ठाण्यात दाखल झाले.
गुरे चोरीसाठी पिकअपचा वापर (Jalgaon News)
पोलिसी खाक्या दाखवताच अकील पिंजारी याने आपल्या साथीदारांसह गुरे चोरी केल्याचे कबूल केले. चोरांनी गुरांची चोरी करुन वाहतूक करण्यासाठी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७१६९) वापरल्याचे सांगितले. शाकीर शाह अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (वय- ३५, रा. मेहरुण), आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद), आणि तौसिफ शेख नवी (रा. फातिमा नगर) या चार जणांचा या चोरीत समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.