Jalgaon Police_News. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगाव पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आउट'; एकाच दिवसात 124 गुन्हे दाखल, अवैध व्यावसायिकांचे मोडले कंबरडे

Jalgaon Police Action, Operation All Out, Jalgaon Operation All Out, Illegal Liquor : अमली पदार्थांचे माहेरघर होऊ पाहणाऱ्या जळगावमध्ये पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे.

Sampat Devgire

Jalgaon Police News : गेले काही दिवस शेजारच्या राज्यातून येणारी शस्त्र आणि अवैध दारू यामुळे जळगाव शहर चर्चेत होते. या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून रविवारी पोलिसांनी दिवसभर ऑपरेशन ऑल आउट राबवले. जळगाव शहरात रविवारचा दिवस गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरला.

पोलिसांनी सर्व स्तरावर मोहीम राबविल्याने किरकोळ गुन्हेगारांपासून तर अवैध व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. या सगळ्यांना वचक बसावा म्हणून पोलिसांची मोठी कारवाई झाली. रविवारी विविध ठिकाणी छापे टाकून 12 मोठे अवैध व्यावसायिकांना अटक करण्यात आली. या कारवाईत ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर २८ हजार १७२ लिटर रसायनासह २० लाख ६० हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले.

शहरातील सर्व अवैध व्यावसायिकांची धरपकड करण्यात आली. यामध्ये 507 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आठ जणांना हद्दपार करण्यात आले. शहरातील संशयास्पद हॉटेल्स आणि लॉजची देखील तपासणी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील अवैध दारू व्यवसायिक तसेच गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. यावेळी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पथक आणि कर्मचारी सक्रिय होते. त्यामुळे शहरभर गुन्हेगार आणि अवैध व्यवसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.

नियम मोडणारे आणि हेल्मेट न घालता वाहने चालविणाऱ्यांवर देखील कारवाई झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर तपासणी करून नागरिकांना कायदा पालनाचे महत्त्व पोलिसांनी सांगितले. बंद कारवाईत शहरभरातून ११.६९ लाख रुपयांची दंड वसुली झाली. जळगाव शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली. शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून यापुढे अशी कारवाई राबविली जाणार आहे. सर्वच पोलिसांनी गांभीर्याने काम करून हे मिशन यशस्वी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT