Jalgaon Politics : जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शरद तायडे यांना उमेदवारी दिली आहे.
असे असताना, यावल नगर परिषदेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी अतुल पाटील यांनी जळगाव येथील भाजप कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली. महाजन यांच्या सोबत पाटील दांम्पत्याची जवळपास एक तास चर्चा झाली.
दरम्यान या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही, भाजपकडून कोणतेही मतदानाचे आवाहन करण्यात आलेलं नाही असं छाया पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही वैयक्तिक कामानिमित्त आलो होतो. हॉस्पिटलच्या कामासाठी भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच पाठिंबा देणार आहोत असे छाया पाटील यांनी सांगितले.
तर अतुल पाटील यांनीही आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहोत अशी भूमिका स्पष्ट केली. मी व्यक्तिगत कामानिमित्त शहरात आलो होतो. आमचे मित्र चंद्रकांत बाविस्कर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सहज फोन केला. ते म्हणाले की, कार्यालयात भेट द्यायला या, गिरीश भाऊ आलेले आहेत. त्या निमित्ताने या ठिकाणी आलो असं अतुल पाटील यांनी स्पष्ट केलं.
पंरतु, छाया पाटील या जिल्ह्यातील ठाकरेंच्या एकमेव नगराध्या आहेत. त्यांच्या गटाकडे १३ नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे. ऐन निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी महाजनांची घेतलेली भेट आणि त्यांच्यासोबत झालेली तासभराची बंद दाराआड चर्चा यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आता रिंगणात तीनच उमेदवार
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. चार उमेदवार रिंगणात होते. चारपैकी शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी माघार घेत महायुतीला समर्थन दिले. यामुळे आता एका जागेसाठी भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शरद तायडे असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.