

जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर माघार घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
"शिंदे साहेबांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे," असे काळे यांनी सांगितले.
Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणुकीतील महायुतीसमोरील बंडखोरीचा पेच अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. काळे त्यांनी स्वतःचा प्रचारही थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे जळगावमधील महायुतीसमोरील बंडखोरीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
रेश्मा काळे या काल (शुक्रवार) सकाळपासून संपर्काबाहेर असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर येत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
जळगाव मतदारसंघात भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळामुळे महायुतीची स्थिती मजबूत मानली जात असली तरी रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे काहीसा पेच निर्माण झाला होता. आता त्यांच्या माघारीमुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकमधील राजकीय पेच सुटल्यानंतर जळगावातील बंडखोरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर जळगावातील तिढाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीने अंतर्गत नाराजी नियंत्रणात आणल्याचे मानले जात आहे.
राज्यातील १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ११ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांवर महायुती विजय मिळवेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.