Uddhav Thackeray, Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : उद्धव ठाकरेंच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुलाबरावांनी केली जादू, सगळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

Gulabrao Patil Politics : जळगावात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आता कंबर कसली आहे. उद्धव ठाकरेंचे तब्बल ३०० कार्यकर्ते त्यांनी गळाला लावले.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : जळगाव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या सर्वांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे महानगर प्रमुख यश सपकाळे आणि गजू कोळी यांच्यासह तब्बल ३०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्षांनी इनकमिंगला मोठे महत्व दिले आहे. तुलनेने शिवनेच्या (शिंदे) गोटात बरेच दिवस शांतता होती. मात्र आता एकाचवेळी ३०० कार्यकर्त्यांना गळाला लावण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व त्यांच्या टीमला यश आलं आहे.

जळगावात यापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात व भाजपमध्ये अनेकदा इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग झाले आहे. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत दुसऱ्या पक्षांतून येणाऱ्यांची काटेकोर पडताळणी व्हावी, असा आग्रह धरला होता. त्यानंतर किमान विधानसभेला महायुतीच्या विरोधात उभे राहिलेल्या लोकांना तरी पक्षात घ्यायचं नाही असा निर्णय भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने घेतला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रत्यक्षात सगळं उलटं आहे. तीन्ही पक्ष निर्णयापासून मागे फिरल्याचे दिसत असून इनकमिंगचा धडाका सुरुच आहे.

भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेही पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने पक्षात घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख संतोष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगावात सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात ३०० कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT