Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Iran- US war:घाबरू नका आम्ही आहोत, आखातात अडकलेल्या जळगावकरांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा दिलासा!

Jalgaon Shiv Sena Gulabrao Patil Iran America war Tourists trapped in Gulf -मंत्री गुलाबराव पाटील यांचे आखातात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न

Sampat Devgire

Gulabrao Patil News: इराण अमेरिका युद्धामुळे आखाती देशांत गंभीर स्थिती आहे. सर्व विमानतळे बंद करण्यात आली आहे. त्याचा पर्यटक आणि भारतीय नागरिकांना मोठा फटका बसला आहे.  

अमेरिका आणि इराण युद्धात आखाती देशांनी अमेरिकेला मदत केली. त्यामुळे आखाती देश इराणच्या टार्गेटवर आले आहेत. त्याचा फटका हजारो भारतीय नागरिकांना बसला आहे. 

या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मंत्री पाटील यांनी जळगावच्या नागरिकांशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आखातात अडकलेल्या जळगावच्या 33 नागरिकांना त्यांनी धीर दिला. 

जळगावचे 33 नागरिक दुबई व अन्य देशात अडकून पडले आहेत. यामध्ये दरसगावच्या पाच नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांशी संपर्क साधून माहिती घेत असल्याचा व्हिडिओ मंत्री पाटील यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. 

इराण युद्धामुळे विमानतळ बंद करण्यात आले आहे. सर्व विमान सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आरक्षित केलेले प्रवासाचे तिकीट देखील रद्द करण्यात आले. संदर्भात पुढे काय? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रातील विविध भागातील शेकडो नागरिक दुबई, सौदी अरेबिया, शारजा आणि अन्य देशांमध्ये अडकून पडले आहेत. सध्या त्यांना निवास आणि भोजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित सर्व सेवा बंद असल्याने मोठा पेज निर्माण झाला आहे. 

या स्थितीत महाराष्ट्र शासनाने ही अडकून पडलेल्या नागरिकांशी संपर्क करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. अडकून पडलेले नागरिक त्यांच्याशी संबंधित लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांशी संपर्क करीत आहेत. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका युद्ध केव्हा संपते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT