Muslim protests : इराणचे खामेनेई यांचा मृत्यू; संग्राम जगतापांची 'अजब-गजब' प्रतिक्रिया चर्चेत!

Iran Ayatollah Ali Khamenei death NCP MLA Sangram Jagtap reaction sparks debate : अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता खामेनेई यांच्या मृत्यूवर अहिल्यानगर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
MLA Sangram Jagtap reaction
MLA Sangram Jagtap reactionSarkarnama
Published on
Updated on

Iran Supreme Leader death : इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात पडसाद उमटले. भारतातीय अनेक भागातील शिया समुदायातील मुस्लिमांनी आक्रोश केला.

श्रीनगर, उत्तर प्रदेश, मुंबई, ठाणे, मुंब्रापर्यंत शिया मुस्लिम समुदायातील लोक रस्त्यावर येत आक्रोश व्यक्त केला. मुस्लिमांच्या या आक्रोशावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्यासाठी हिंदू जनआक्रोश मेळावा घेतला. या मेळाव्यात आमदार जगताप सहभागी झाले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना, आमदार जगताप यांनी मुंबईत शिया मुस्लिम समुदायाने रस्त्यावर येत आक्रोशावर टिप्पणी केली.

संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले, "आज वेगळा कुठला तरी, माणूस जातो, तेव्हा याचा यांचा काही संबंध नाही, यांनी त्याला पाहिलेलं नाही. हे त्याच्या लग्नाला गेलेले नाहीत. त्याच्या कुटुंबातील कोणी लग्नाला गेलेलं नाही अन् त्याच्याही लग्नाला यांच्या कुटुंबातलं कोणी गेलेलं नाही. पण यांना इतक्या वेदना झाल्यात, यांचा पवित्र रमजानचा महिना देखील, सुखात जाईल की नाही, इतकी भायनक स्थिती यांच्या मनात झालेली पाहायला मिळते."

MLA Sangram Jagtap reaction
Congress MP Kalyan Kale : काँग्रेस खासदाराची सहल ठरली थरारक! दुबईत क्षेपणास्त्रांचा वर्षाव, कल्याण काळे सुरक्षित पण तणावात!

'मुंबईत या मुस्लिमांनी रस्त्यावर येऊन आक्रोश करणे हे वेदनादायक चित्र आहे, असे टिप्पणी करताना, भारतामधील मी वेगवेगळ्या घटना पाहायला आहेत, अनुभवल्या आहेत, वाचल्या आहेत. भारतातील जवान शहीद झाला किंवा आतंकवादी हल्ला झाला, त्याच्या निषेधासाठी हा विशिष्ट समाजाने रस्त्यावर येत नाही,' याकडे संग्राम जगताप यांनी लक्ष वेधले.

MLA Sangram Jagtap reaction
Sangram Jagtap controversial statement : दिवाळीला खरेदी हिंदूंकडून, आता रिक्षावालाही हिंदूच? जगतापांच्या विधानाने पुन्हा पेटला वाद

'पाकिस्तानचा निषेध कधी करत नाही. ज्यावेळी एखादा दहशतवादी मारला जातो, त्यावेळी त्यांच्या अंतविधीसाठी हजारो लोक रस्त्यावर येतात. मुंबईसारख्या ठिकाणी मोर्चा निघणे हे अत्यंत वाईट वाटण्यासारखं आहे. भारत भूमीचा माणूस जातो, त्यावेळी यांना वाईट वाटत नाही,' असेही संग्राम जगताप यांनी म्हटले.

अभ्यासा अभावी 'अजब-गजब' प्रतिक्रिया?

संग्राम जगताप यांनी इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवर दिलेली 'अजब-गजब' प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. प्रतिक्रिया देताना जगताप यांना इराणच्या सर्वोच्च नेत्याची नाव देखील उच्चारता आले नाही. कोणता मुस्लिम समुदायाने आक्रोश केला, याचा देखील प्रतिक्रियेत उल्लेख नाही. माध्यमांनी विचारलं, अन् जगतापांनी सरसकट प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना, संबंधित मुद्दाचा आमदारांचा अभ्यास नसल्याचं निरीक्षण, आता विरोधकांकडून नोंदवलं जाऊ लागलं आहे.

आव्हाडांचे इराण-भारत संबंधांवर वेधलं लक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे इथले आमदार तथा पक्ष प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी इराण-भारत संबंधांवर जुनी आठवण सांगत एका वाक्यात विषय संपवला. 'स्वातंत्र्यानंतर भारताला तेलाची खूप गरज होती. त्यावेळी इराणने अतिशय स्वस्तात तेल दिलं होतं,' अशी जुनी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com