Mangesh Chavan & Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil: एका पोलिस अधिकाऱ्यासाठी चाळीसगावात मोठा राजकीय स्फोट! उन्मेष पाटील अन् मंगेश चव्हाण भिडले!

Jalgaon Shiv Sena Umesh Patil BJP MLA Mangesh Chavan Political Conflict Token- फौजदारावर कारवाईसाठी महायुतीतच धमासान; आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील इरेला पेटले!

Sampat Devgire

Unmesh Patil News: चाळीसगावचे राजकारण सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त निर्णयाने चर्चेत आले आहे. माजी खासदार उन्मेष पाटील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी इरेला पेटले आहे. दुसरीकडे भाजपा आमदार पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र रंगवले जात आहे. 

चाळीसगाव (जळगाव) पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाकडून एका तरुण आणि पत्रकारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईने राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्धांगिनी या कारवाईसाठी पुढे सरसावल्या होत्या. त्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला ते निमित्त मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आमदार मंगेश चव्हाण यांचे चाळीसगाव वर एकतर्फी वर्चस्व आहे. या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी माजी खासदार उन्मेश पाटील सातत्याने आव्हान देत असतात. सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद टोकाला पोहोचला आहे. 

पोलिसांविरुद्ध कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या युवकाला माजी खासदार पाटील यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना जीभ घसरल्याने ते पोलिसांवरील चांगलेच बर असले. या संधीचा लाभ घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी माजी खासदार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

या निमित्ताने चाळीसगाव तालुक्यात पोलिसांकडून अत्याचार सुरू आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यावर वरिष्ठ अत्याचार करीत आहेत. त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार पाटील यांनी केला. 

या प्रकरणात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण आपली शक्ती का वापरत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून फक्त वसुलीसाठी ते आहेत काय? असा प्रश्न करून माजी खासदार पाटील यांनी कारवाईसाठी संध्याकाळी पाच वाजेची वेळ दिली होती. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांचीही भेट घेण्यात आली आहे.

माजी खासदार पाटील यांनी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईसाठी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने थेट वरिष्ठांकडे धाव घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या विषयावर विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही पाटील म्हणाले. 

या निमित्ताने पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार माजी खासदार पाटील यांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा विषय केला आहे. दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण हे मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईवरून सुरू झालेले आमदार आणि माजी खासदार यांच्यातील राजकारण या निमित्ताने कोणत्या थराला जाते, याची आता चाळीसगावच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT