Maratha Bhavan : धनंजय मुंडेंची अडचण वाढणार? 'मराठा भवन'च्या जागेवरून वाद पेटल्यानंतर विरोधक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे...

Parli land dispute news : धनंजय मुंडे यांनी परळी येथील मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटला आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसापासून या-ना त्या कारणाने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. धनंजय मुंडे यांनी परळी येथील मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटला आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मराठा भवनसाठी श्री दत्त देवस्थान थोरले देवघर यांच्या जमिनिचा बेकायदेशीरपणे ताबा धनंजय मुंडे यांनी दिला असल्याचा आरोप श्री दत्त देवस्थान थोरले देवघरचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला असून, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Dhananjay Munde
MIM Strategy : शिवसेना-भाजपने MIMला घेरले; पण इम्तियाज जलीलही पलटवार करण्याच्या तयारीत!

परळीमध्ये 14 मे रोजी आमदार धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन करत मराठाभवनासाठी 28 गुंठे जमीन दिली होती. मात्र या जमिनीवरून आता मोठा वाद पेटला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे सर्व कागदपत्रे आणि निवेदन देऊन सदरील जमीन आपल्या मालकीची असून तिचा बेकायदेशीर ताबा देण्यात आला, या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी आता संस्थेकडून करण्यात आली आहे.

Dhananjay Munde
Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

श्री दत्त देवस्थान संस्थानच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा ‘मराठा भवन’साठी दिल्याप्रकरणी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह अन्य संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी संस्थानने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Dhananjay Munde
Pawan Rajenimbalkar murder case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाची तारीख ठरली; सुपुत्र, खासदार ओम राजेनिंबाळकरांना मात्र वेगळीच चिंता अन् खंत...

विशेष म्हणजे वर्ग-2 ची ही इनामी जमीन आहे, असे असतानाही संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास हायकोर्ट जाण्याचा आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा देखील यावेळी संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Dhananjay Munde
Maharashtra Politics Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com