Unmesh Patil cheating case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil case : शिवसेनेच्या शिलेदाराला न्यायालयाचा मोठा दिलासा; निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा डाव उलटवला!

Jalgaon ShivSenaUBT Ex-MP Unmesh Patil Granted Bail in Cheating Case : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार उमेश पाटील यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.

Sampat Devgire

Jalgaon cheating case : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावचे राजकारण तापले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला आव्हान दिले होते. त्यामुळे भाजपविरुद्ध माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यात जोरदार आरोप सुरू होते.

जळगाव नगरपालिका निवडणुकीचे राजकारण भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांत टोकाच्या आरोपांनी रंगले आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी विरोधकांची विविध मार्गाने कोंडी केली होती. मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होऊ शकलेल्या नाही.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनयोग न केल्याचा आरोप होता. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी (Police) माजी खासदार उन्मेश पाटील यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र माजी खासदार पाटील पोलिसांना सापडले नव्हते. त्यांच्या घरी जाऊन नोटीस देखील बजावण्यात आली होती. आता या संदर्भात जळगाव जिल्हा न्यायालयाने माजी खासदार पाटील यांना मोठा दिल्याचा दिला आहे. शुक्रवारी न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उन्मेष पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेकडून 15 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील सहा कोटींची मशिनरी परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप होता. त्यामुळे बँकेने हा गुन्हा दाखल केला होता. माजी खासदार पाटील यांच्यावतीने ॲड. वसंत डाके यांनी न्यायालयात बाजू मांडली. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या विरोधकांनी केलेले हे सुडाचे राजकारण असल्याचा दावा करण्यात आला.

संबंधित बँकेकडून 15 कोटी कर्ज घेतले त्याच्याशी माजी खासदार पाटील यांचा कोणताही संबंध नाही. पंधरा कोटीचे कर्ज घेताना 50 कोटींची मालमत्ता तारण देण्यात आली आहे. यासंदर्भात कोणती अनियमितता झाली नाही. हा ॲड. ढाके यांचा दावा न्यायालयाने मान्य केला.

त्यामुळे आता उन्मेष पाटील नगरपालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार उन्मेष पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यासह भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकीय हल्ले सुरू आहेत. हे हल्ले आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने माजी खासदार पाटील यांना पोलिसांच्या खटल्यात अडकवण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT