Jalgaon rail 7.jpeg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Railway Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबई लोकलमधला 32 वर्षांपूर्वीचा 'तो' अपघात आला पुन्हा चर्चेत..!

Mumbai Local Accident : जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक ट्रेनने करणाऱ्या प्रवाशांचा भीषण अपघात झाला. पुष्पक ट्रेनला आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे ट्रेन थांबली असताना देखील 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली. मात्र, समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं

Deepak Kulkarni

Mumbai News : जळगावमधील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने मोठी दुर्घटना घडली. आग लागल्याच्या अफवेमुळे ट्रेन थांबली असताना देखील 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून (Railway Accident) खाली उड्या मारल्या. मात्र, समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यात आत्तापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे मुंबईत 32 वर्षांपूर्वी घडलेला रेल्वे अपघात चर्चेत आला आहे.

मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अशीच आग लागल्याच्या अफवा पसरली होती. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटवरून सुटलेली लेडीज स्पेशल लोकल कांदिवली स्टेशनमधून पुढे आल्यानंतर ही आग लागल्याची अफवा पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. यामुळे काही महिलांनी भीतीनं दुसऱ्या ट्रॅकवर पटापट उड्या मारल्या. पण विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लोकलनं या उड्या महिला सापडल्या.या दुर्घटनेत 49 महिलांचा बळी गेला होता.

त्यावेळी लोकलमधील महिलेच्या धूर येत निदर्शनास आलं होतं.त्या महिलेने आरडाओरडा केल्यानं डब्यात असलेल्या महिलांमध्ये मोठा गोंधळ उडाला.तर काही महिलांनी यावेळी लोकलची साखळी खेचण्यासाठी प्रयत्न केले. पण तरीही लोकल थांबत नसल्याचं दिसताच महिलांनी रेल्वे ट्रॅकवरच उड्या घेतल्या. मात्र, जीव वाचवण्यासाठी उड्या घेतलेल्या महिलांना दुसऱ्या लोकलनं चिरडलं.

या घटनेवेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु होता. ही घटना संध्याकाळी घडली होती. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बचावकार्यातही मोठा अडथळा आला होता. आता जळगावातील रेल्वे दुर्घटनेमुळे मुंबईतील त्या लेडिज स्पेशल लोकलच्या अपघात चर्चेत आला.

जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक ट्रेनने करणाऱ्या प्रवाशांचा भीषण अपघात झाला. पुष्पक ट्रेनला आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे ट्रेन थांबली असताना देखील 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली. मात्र, समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी आहेत. दरम्यान, हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडला आहे. चालकानं अचानक ट्रेनचं ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकामधून ठिणग्या उडाल्या, ठिणग्या पाहून प्रवासी घाबरले, आग लागल्याची अफवा पसरली. ही घटना बुधवारी (ता.22) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर काही जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचदरम्यान समोरून बंगळूरू एक्स्प्रेस येत होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT