
Manipur News : बिहारच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयू पक्षानं मणिपूरमध्ये मोठा निर्णय घेतला. त्याचे पडसाद पाटणा ते दिल्ली जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत उमटल्याचे पाहायला मिळाले. एनडीए सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं मणिपूरमध्ये थेट भाजप सरकारचाच पाठिंबाच काढून घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पण काही तासांतच आता राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार्या जेडीयूच्या प्रदेधाध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
केंद्रात नितीश कुमारांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम पार्टी यांच्या पाठिंब्यावर एनडीए सरकार सत्तेत आहे.त्यातच मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे नेते आणि नितीश कुमार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा असतानाच बुधवारी (ता.22) मणिपूरमध्ये भाजप सरकारचाच पाठिंबा काढून घेतल्याची बातमी समोर आली. यामुळे एनडीए सरकारला मोठा धक्का मानला जात होता.
मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयाचा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारवरही याचा मोठा दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता होती. पण आता मणिपूरमधून आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. जेडीयूने मणिपूरमध्ये एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र राज्यपालांना देणाऱ्या प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनाच मोठा झटका दिला आहे.
वीरेंद्र सिंह यांची या निर्णयानंतर काही तासांतच मणिपूर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पत्रामुळेच मणिपूरमध्ये सत्तेत असलेली जेडीयू आणि भाजपाची युती तुटल्याचं समोर आलं होतं. वीरेंद्र सिंह यांना भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चांगलाच भोवला असल्याचं दिसून येत आहे.
60 जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपकडे 32 जागा मिळवून बहुमतासह सत्तेत आहे. त्याचसोबत नितीश कुमारांचा जेडीयू पक्षाच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे 5 आमदार भाजपने गळाला लावले. आता मणिपूरमध्ये जेडीयूकडे अवघा एकच आमदार शिल्लक आहे. तरीही मणिपूरमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सरकारमध्ये सामील होते. पण आता त्यांच्या पक्षाने भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानं जेडीयूला मणिपूरमध्ये विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली होती.
बिहारमध्ये याचवर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय केंद्रातील भाजपावर दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा होती. मात्र, वीरेंद्र सिंह यांच्यावरील कारवाईमुळे भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाला नितीश कुमारांची संंमतीशिवाय घेतल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.