
Jalgaon Railway Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात कसा झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी अपघाताला आपत्कीलन साखळी (अलार्म चेन पुलिंग) कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी यांनी पत्रकार परिषदेत अपघात कसा झाला, याची माहिती दिली. ते म्हणाले, जळगाव रेल्वे स्थानकातून दुपारी चार वाजता पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे निघालेली. पाचारो रेल्वे स्थानकाजवळ ही गाडी आल्यानंतर आपत्कालीन चेन ओढण्यात आली. त्यामुळे गाडी थांबली. त्यानंतर गाडीतील प्रवासी खाली उतरले.
पुष्पक एक्सप्रेस ज्या ट्रकवर थांबली, त्याच्या शेजारच्या ट्रॅकवरून बेंगलुरूवरून कर्नाटक एक्सप्रेस जात होते. पुष्पक एक्सप्रेसमधून उतरलेले काही प्रवासी या ट्रकवर उभे होते. त्यामुळे कर्नाटक एक्सप्रेसने काही प्रवाशांना धडक दिली, अशी माहिती नीला यांनी दिली आहे. चेन पुलिंगनंतर अचानक थांबल्यानंतर चाकाजवळून ठिणग्या उडल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशी भीतीने खाली उतरल्याचे काही प्रवाशांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 5 ते 7 प्रवासी जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. रेल्वेकडे अद्याप याबाबत अधिकृत माहिती नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.
सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.