Jalna Partur school viral video controversy  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

School Video Controversy : पाकिस्तानचे 'सर तन से जुदा' हे गीत वाजलेल्या शाळेवर कारवाईची टांगती तलवार? व्हायरल व्हिडिओनंतर भाजप नेत्याचा धक्कादायक दावा

Kirit Somaiya On Jalna Partur School Video Controversy : जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेत पाकिस्तानचे 'सर तन से जुदा'हे गीत वाजवल्यानंतर मोठा वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Jalna Partur School Viral Video Case : जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेत पाकिस्तानचे 'सर तन से जुदा'हे गीत वाजवले गेले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर ता नव्या वादाला तोंड फुटले असून यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. यानंतर आता या शाळेवर मोठ्या कारवाईचे संकेत देत ती पाडावी लागणार असे सुतोवाच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेतील वार्षिक समारंभात पाकिस्तानचे 'सर तन से जुदा'हे गीत वाजले. या गीतावर मुलांनी नृत्य करताना हातात नकली तलवारी नाचवल्या. तर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या प्रकरणावरून शाळेवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (ता. ३) पोलिसांच्या सोबत या शाळेचा दौरा केला. यावेळी सोमय्या यांनी शाळेची,शाळेच्या परिसराची पाहणी केली. कागदपत्रांची पाहणी केली. तसेच या शाळेबाबत मोठा दावा करत मोठ्या कारवाईचे संकेत दिले.

यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना, ही शाळा सरकारी जमीनीवर उभी असून ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. तसेच या शाळेला शिक्षण विभागाची रितसर मान्यता नसून ती आता सील करण्यात आली आहे. सध्या पुढील कारवाई सुरू असून अशा प्रकारचे गीत वाजवले जाणे चुकीचे आहे. तर असे कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही.

महाराष्ट्रात भाजपचे सरकार असून शाळेत अशाप्रकारे पाकिस्तानचे गीत वाजवणे सहन केले जाणार नाही. बांगलादेशी असो की पाकिस्तानी किंवा अतिरेकी यांचे समर्थन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई ही केलीच जाईल, असेही म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT