Mushtaq Dignity News : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मालेगाव दौरा सबंध राज्याला राजकीय विषय देऊन गेला आहे. मालेगाव शहर दहशतवादाचे केंद्र झाले आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान येथे वास्तव्याला आहेत. शासनाच्या चौकशी समितीत याबाबत गंभीर मुद्दे पुढे आले आहेत, या त्यांच्या विधानाला विविध राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. पण त्याचवेळी शहाराचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी बाळगलेले मौन चर्चेचा विषय बनले आहे.
किरीट सोमय्या यांच्या विधानांना आणि द्याव्यांना राज्यातील काँग्रेस पक्षासह अन्य विरोधकांनी उत्तर दिले. समाजवादी पक्षाचे नेते, नगरसेवक मुष्तकीन डिग्निटी यांनी सोमय्या यांना मालेगाव शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी केली आहे. सोमय्या यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र शहराचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सोमय्या प्रकरणावर मौन धारण केले आहे. यावर मुश्तकीन डिग्निटी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार मौलाना मुफ्ती यांना थेट आव्हान दिले आहे.
"मालेगाव शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एमआयएम पक्षाच्या आमदारांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. ते भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला घाबरतात. त्यामुळे मालेगाव शहराचे कितीही नुकसान झाले तरी त्यांना आपले स्वतःचे राजकारण अधिक प्रिय आणि महत्त्वाचे वाटते. शासनाने नेमलेल्या पोलिसांच्या एसआयटीचा अहवाल गतवर्षी येणे अपेक्षित होते. तो का आलेला नाही?. मालेगाव शहरात एकही बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही.
असे असताना सोमय्या कशाच्या आधारावर आरोप करतात? या प्रश्नावर विधिमंडळ अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडणे अपेक्षित होते. मात्र आमदारांनी मालेगावकरांना वाऱ्यावर सोडले आहे. एमआयएम पक्ष आणि आमदार दोघेही भाजपला शरण गेले आहेत, मालेगाव शहराचे हित न पाहता आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यांना जनता मोकळे सोडणार नाही, असा दावा डिग्निटी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.