Jat Panchayat Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jamkhed Jat Panchayat Case : ‘जात पंचायतीचा पंच’ म्हणत 5 लाखांची मागणी; पैसे न दिल्याने कुटुंबावर लोखंडी गजाने हल्ला

Family assaulted after refusing a ₹5 lakh demand in Jamkhed : जामखेड तालुक्यातील आरोळेवस्तीतील धक्कादायक प्रकार; चौघे जखमी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pradeep Pendhare

Jamkhed Crime News : जामखेड तालुक्यातील आरोळेवस्ती येथे जात पंचायतीचा पंच असल्याचे सांगत पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. या वादातून कुटुंबातील सदस्यांना लोखंडी गज व दगडाने मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी बाबू तात्या शिंदे (वय 49, रा. आरोळे वस्ती, जामखेड) यांनी फिर्याद दाखल केली. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यल्लाप्पा लोखंडे, विलास यल्लाप्पा लोखंडे व सुनीता लक्ष्मण दासरजोगे हे बाबू शिंदे यांच्या घरासमोर आले. वसंत याने जात पंचायतीचा पंच असल्याचे सांगितले. पाच लाख रुपये देण्याची मागणी केली.

बाबू शिंदे यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर किरण लोखंडे याने गजाने मारहाण करण्यास सुरूवात केली. इतर आरोपींनी बाबू शिंदे, शांताबाई शिंदे, सागर शिंदे व बेबी शिंदे यांनाही मारहाण केली.

या मारहाणीत शांताबाई यांचे दागिने गहाळ झाले. या घटनेत बाबू शिंदे यांच्यासह शांताबाई शिंदे, सागर शिंदे व बेबी शिंदे असे चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस हवालदार एस. डी. लोखंडे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT