Jayant Patil & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil: जयंत पाटील यांनी माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाची हवाच काढली!

Jayant Patil on Manikrao kokate: आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांचे शक्ती प्रदर्शन

Sampat Devgire

Maharashtra Assembly 2024: सिन्नर मतदार संघाची निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांनी शनिवारी थेट आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बालेकिल्ल्यातच शक्ती प्रदर्शन करीत आव्हान दिले. त्यामुळे ही सभा चर्चेचा विषय ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विविध नेत्यांच्या उपस्थितीत शहा येथे सभा झाली. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, कोंडाजी मामा आव्हाड, अॅड संजय सोनवणे, उमेदवार उदय सांगळे आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे आमदार माणिकराव कोकाटे आपण यंदा निवडून आल्यास मंत्री होणार, असा दावा विविध सभांमध्ये करीत आहेत. मात्र त्यांच्या या दाव्यातील हवाच श्री. पाटील यांनी काढली. श्री. पाटील म्हणाले अजित पवार पक्षाचे नेते राज्यभर जिथे जिथे प्रचाराला जातात, तेथील प्रत्येक आमदाराला मंत्री करणार अशी घोषणा करतात. आजवर त्यांनी शंभर मतदारसंघात अशी घोषणा केली आहे. तुम्ही आमच्या उमेदवाराला आमदार करा आम्ही त्यांना मंत्री करतो, असे ते सांगतात. श्री. पाटील यांच्या या वक्तव्याने आमदार कोकाटे यांच्या प्रचारातील हवाच काढण्याचा प्रयत्न झाला.

आमदार कोकाटे यांच्या बालेकिल्ल्यातच या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी आमदार कोकाटे यांनी केवळ सत्तेसाठी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली. ज्येष्ठ नेते पवार महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आणि भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी राज्यात केलेला अनैतिक राजकीय प्रयोग मोडीत काढण्यासाठी परिश्रम घेत आहेत. अशावेळी देशात नावलौकिक असलेल्या ज्येष्ठ नेत्याशी सिन्नरच्या आमदाराने गद्दारी केली.

राज्यातील महायुतीचे सरकार हे केंद्राच्या सरकार पुढे नतमस्तक झाले आहे. त्यांच्या कारकीर्दीत राज्यातील असंख्य प्रकल्प गुजरातला गेले. या नाकर्त्या सरकारमुळे गुजरातची भरभराट होत आहे. महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केली जात आहे. हे असेच सुरू राहिल्याने महाराष्ट्र मागे पडला.

आपल्या तरुणांना भविष्यात गुजरातला नोकऱ्या मागण्यासाठी जाण्याची वेळ टाळा. महाविकास आघाडीने येथे निवडणुकीत राज्याच्या विकासाचा आणि स्वाभिमानाचा उद्देश घेऊन निवडणुकीत विरोधकांचा पराभव करण्यासाठी विडा उचलला आहे. सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी पंचसूत्री राबविणार आहे.

प्रत्येक महिलेला दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील. शेती पिकांना हमीभाव देण्यात येईल, प्रत्येक कुटुंबाचा 25 लाखांचा आरोग्य विमा उतरविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT