Sanjay Raut politics: उद्धव ठाकरेंचा ऐन निवडणुकीत भाजपला धक्का, माजी नगरसेवक शिवबंधनात अडकणार

Sanjay Raut; shock for Prakash Ambedkar, important leader Pavan Pawar will join Shivsena Thackeray party-भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विक्रम नागरे आणि वंचित आघाडीचे नेते पवन पवार लवकरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात?
Sanjay Raut, Sudhakar Badgujar, Pavan Pawar & Vikram Nagre
Sanjay Raut, Sudhakar Badgujar, Pavan Pawar & Vikram NagreSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics: सध्या विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पवन पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम नागरे यांनी खासदार राऊत यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या भेटीने खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut, Sudhakar Badgujar, Pavan Pawar & Vikram Nagre
Eknath khadse News: खडसेंचा प्रश्न, गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघासाठी केले तरी काय?

हे दोन्ही नेते लवकरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. आज खासदार राऊत यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी याबाबत संकेत दिले. हे दोन्ही नेते ठाकरे पक्षात प्रवेश करतील. याबाबत गेले दोन महिने चर्चा होती. आजच्या भेटीने त्याला दुजोरा मिळाला आहे.

Sanjay Raut, Sudhakar Badgujar, Pavan Pawar & Vikram Nagre
Jayant Patil : अरे, तुमचा काकाच हा विषय पूर्ण करणार ; जयंतरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे अन्य नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्यांची भेट झाली. पवन पवार हे वंचित बहुजन आघाडीचे नाशिक मधील प्रमुख नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळाली होती.

लोकसभेच्या 2019 ची निवडणूक श्री. पवार यांनी लढविली होती. त्यात त्यांना दीड लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे ते सबंध जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून परिचित आहेत. विशेषत: नाशिक शहरात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो.

भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे नेते विक्रम नागरे हेदेखील भाजप पक्षाला राम राम करण्याच्या परिस्थितीत आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदार संघातून त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. सातपूर आणि पिंपळगाव परिसरात यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना त्याचा फटका बसू शकतो.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उमेदवार बडगुजर यांच्याशी त्यांची जवळीक भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. विक्रम नागरे यांच्या मातोश्री भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व दिले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सध्या लांबलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. त्याचा सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक पूर्व वगळता उर्वरित देवळाली, नाशिक मध्य आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे पक्षाला झुकते माप मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे पक्षाला ते लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com