Dilip Khodpe Politics: दिलीप खोडपे यांचे सडेतोड उत्तर, गिरीश महाजन आता जमिनीवर आले!

Girish Mahajan; NCP assembly election candidate Dilip khodpe criticized BJP leader Mahajan Unawailable in Constituency-मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे भाजपच्या उमेदवारांना जनतेत राहण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर जामनेरचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी त्यांना सुनावले.
Dilip Khodpe & Girish Mahajan
Dilip Khodpe & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khodpe Vs Mahajan News: जामनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश महाजन आपला मोठा जनसंपर्क असल्याचा दावा करतात. ते सर्व दावे खोडून काढण्यात आले आहेत. याबाबत त्यांचे विरोधक आणि एकेकाळचे घनिष्ठ सहकारी दिलीप खोडपे यांनी मंत्री महाजन यांच्याविषयी काही दावे केले आहेत.

जामनेर मतदार संघात यंदा भाजपचे विद्यमान आमदार व मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्यात थेट लढत आहे. या संदर्भात शनिवारी मतदार संघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जाहीर सभा झाली. यावेळी उमेदवार खोडपे यांनी महाजन यांच्या विषयी वक्तव्य केले.

Dilip Khodpe & Girish Mahajan
Sanjay Raut politics: उद्धव ठाकरेंचा ऐन निवडणुकीत भाजपला धक्का, माजी नगरसेवक शिवबंधनात अडकणार

नाशिक येथे मंत्री गिरीष महाजन यांनी आमदारांनी लोकांमध्ये राहिले पाहिजे. लोकांच्या संपर्कात राहिल्यास निवडून येण्यात कोणतीही अडचण येत नाही, असा सल्ला दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री महाजन यांचे एकेकाळचे घनिष्ठ सहकारी असलेले राष्ट्रवादीचे खोडपे यांनी मंत्री महाजन यांचे मतदारसंघात कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क राहिला नसल्याचे, जाहीरपणे सांगितले. मंत्री महाजन यांचा दावा त्यांनी खोडला.

Dilip Khodpe & Girish Mahajan
Eknath khadse News: खडसेंचा प्रश्न, गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघासाठी केले तरी काय?

श्री खोडपे म्हणाले, मंत्री महाजन यांनी भागपुर पाटबंधारे प्रकल्पाचा आराखडा मंजूर झाल्याचा दावा केला होता. त्याला पाच-दहा वर्षे झाली. मात्र काम पुढे सरकलेले नाही. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पाईपलाईन द्वारे शेतीला पाणी देणार, असे आश्वासन दिले होते. यातले काहीही झालेले नाही. मतदार संघात कोणतेच ठोस काम नाही, असा आरोप खोडपे यांनी केला.

मंत्री महाजन मतदार संघात आपल्या विरोधात कोणीही तयारच होऊ नये, असे डावपेच खेळतात. राष्ट्रवादीचे संजय गरुड त्यांच्या विरोधात उमेदवारी करतात म्हणून त्यांनी गरुड यांनाच भाजपमध्ये घेतले. आता आपल्या विरोधात कोणीच उमेदवारी करू शकणार नाही, असा त्यांचा समज झाला होता. मात्र तो खोटा ठरला आहे.

मंत्री महाजन हे कार्यकर्त्याला केवळ खोटी आश्वासने देतात. माणसाला माणूस समजत नाहीत. कोणाशीही बोलत नाहीत. सध्याची जामनेर विधानसभा निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे मंत्री महाजन जमिनीवर आले आहेत.

सध्या मंत्री महाजन स्वतःहून कार्यकर्त्यांना फोन करू लागले आहेत. तुमचे काय काम आहे? हे विचारू लागले आहेत. त्याचे काय काम आहे, हे न ऐकताच तुमचे काम होऊन जाईल, अशी आश्वासने देऊ लागले आहेत. मात्र जनतेला आता सर्व समजून चुकले आहे. त्यामुळे हे राजकारण कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यात यशस्वी होणार नाही.

जामनेर मतदार संघात मी जिथे जातो तेथे माझे अतिशय प्रेमाने व आपुलकीने स्वागत होते, असे खोडपे म्हणाले. मी अतिशय गरीब आणि जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. लोक मला आमच्या गावात येऊ नका. आम्ही तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा देणार, असे सांगत `एक नोट, एक वोट` अशी मोहीम सबंध मतदारसंघात सुरू झाली आहे. जनता जनार्दनाचा मला आशीर्वाद मिळतो आहे.

जामनेर मतदार संघात आता सगळे लोक जागृत झाले आहेत. मुस्लिम, मागासवर्गीय, मारवाडी आणि मराठा हे चार `एम` गिरीश महाजन यांना आता घरी आराम करायला लावतील. याशिवाय माळी, धनगर आणि बंजारा हे समाज एकत्र झाले आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांचे काय होईल? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या निवडणुकीत सगळ्यांनी ग्रामपंचायतीला होते, तसे पेटून उठावे आणि मतदान करावे, असे खोडपे यांनी आवाहन केले. त्याला उपस्थितांनी घोषणा, टाळ्या, शिट्ट्या देत प्रतिसाद दिला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com