Jayashree Thorat and Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayashree Thorat: सुजय विखेंनी बोलून दाखवली 'ती' खंत; जयश्री थोरातांनी खोचक टोला लगावत पुन्हा डिवचलं

Ahmednagar Political News : लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत सुरळीत सुरू होते. परंतु एप्रिलमध्ये गडबड व्हायला सुरवात झाली. ती काय गडबड झाली माहिती नाही. खासदारकी गेली मग आमदार होऊ, असे वाटले.

Deepak Kulkarni

Ahilyanagar News : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुजय विखेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी करेक्ट कार्यक्रम केला होता. हा पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी संगमेनर मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा होती. पण तो मतदारसंघ महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गेला. पण याच विखेंनी त्यांच्या आयुष्यातील घडामोडींविषयीची खंत बोलून दाखवली.त्यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सुजय विखे विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहे. प्रचारसभांचा त्यांनी जिल्ह्यात धडाका लावला आहे. पण त्यांनी आपलं ग्रहमानच सध्या ठीक नसल्याची खंत बोलून दाखवली होती. त्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेर मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी खोचक टोला लगावत सुजय विखेंना डिवचलं आहे.

काँग्रेसच्या महिला नेत्या जयश्री थोरात आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.यावरुन संगमनेरमध्ये विखे-थोरात समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.जयश्री थोरात यांनी पुन्हा एकदा विखेंवर निशाणा साधला आहे.त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

भाजप खासदार सुजय विखेंनी मध्यंतरी प्रचारसभेत माझं काही शिजायला लागलं की, कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय,अशी खंत बोलून दाखवली होती.त्यावर जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,आमच्या संगमनेर तालुक्याला अशा राट भाषेची सवय नाही.त्यामुळे त्यांची रेसिपी, ठिकाण आणि वेळही चुकली, अशी खोचक टिप्पणी थोरात यांनी केली आहे.

जयश्री थोरात नेमकं काय म्हणाल्या..?

सुजय विखेंनी संगमनेर तालुक्यात चार सभा घेतल्या आणि त्यांमध्ये जर त्यांना वाटत असेल, त्यांचं पातेलं शिजलं, तर तो त्यांचा गैरसमज म्हणायला हवा.4 सभांमध्ये पातेलं शिजलं असं म्हणता येणार नाही. तो त्यांचा गैरसमज आहे.त्यांनी आमच्या भागात घेतलेल्या सभा या वेगळ्या होत्या.आमच्या तालुक्याला अशा भाषेची सवय नाही. त्यांच्या पातेल्यातलं शिजलं असलं तरी त्याची चव चांगली नसेल अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला आहे.बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मात्र, सुजय विखे पाटील यांच्या एका मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद उफळला होता. त्याबद्दल बोलताना सुजय विखे यांनी माझं कुठे काही शिजायला लागलं की, कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना व्यक्त केली होती.

'लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान...'

भाजप नेते सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत बोलताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली होती.ते म्हणाले होते,माझ्या नशिबात सध्या गडबड सुरू आहे. माझं काही शिजायला लागलं की, लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतं. लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत.

'आता मी त्या गोष्टी वेळेवर करेन..'

लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत सुरळीत सुरू होते. परंतु एप्रिलमध्ये गडबड व्हायला सुरवात झाली. ती काय गडबड झाली माहिती नाही. खासदारकी गेली मग आमदार होऊ, असे वाटले. संगमनेरला गेलो. तिथं चार सभा घेतल्या. सुजय विखेच आमदार होणार, असे लोक म्हणू लागले. तेवढ्यात तिथं शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली गोली. आता मी त्या गोष्टी योग्य वेळेवर करेन", असंही सुजय विखे यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT