Chinchwad Assembly Constituency: ...म्हणून चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतोय चक्क उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नेता!

Shivsena UBT Leader supports BJP Candidate in Chinchwad Election: जाणून घ्या नेमकं काय आहे 'राज'कारण? ; कारवाईचीही नाही परवा, मतदारसंघात ठरतोय चर्चेचा विषय
Vidhansabha Election
Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

PCMC News: चिंचवड मतदारसंघ हा आता भाजपचा गड समजला जात आहे. कारण, या ठिकाणी अन्य पक्षातील बहुतांश पदाधिकारी आणि नेते हे भाजपमध्ये गेल्याचे मागील काळात दिसून आले आहे. शिवाय विद्यमान आमदार आश्विनी जगतापही भाजपच्याच आहेत. तर यंदा त्यांचेच दीर शंकर जगताप हे भाजपकडून निवडणुकीची रिंगणात आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र गोंधळच दिसत आहे. कारण, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि नेते मोरेश्वर भोंडेवे हेच स्वत: उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उतरले आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.

खरंतर मोरेश्वर भोंडवे यांनी निवडणुकीचं तिकीट आपल्यालाच मिळेल या आशेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. परंतु हा मतदासंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाने आपल्याकडे घेतला आणि भोंडवेंच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेलं. मग भोंडवेंनीही महाविकास आघाडीला हात दाखवत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात उडी घेतली आहे.

Vidhansabha Election
Aba Bagul : 'पटोलेंना काँग्रेस टिकवायची नाही तर संपवायची आहे, ते फक्त..' ; आबा बागुल यांचं मोठं विधान!

भोंडवे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करण्याऐवजी शंकर जगताप यांच्या प्रचारात सक्रीय दिसत आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या सुरुवातीस काहीही झालं तरी मी भाजपचा (BJP) प्रचार करणार नाही,असं खुद्द भोंडवे यांनीच म्हटलेलं होतं. मात्र आता तेच भाजपच्या उमेदवारास विजयी करण्यासाठी प्रचारात दिसत आहेत. एवढंच नाहीतर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली तरी हरकत नाही, अशी त्यांनी भूमिका घेतल्याने सध्या मतदारसंघात त्यांची प्रचंड चर्चा दिसत आहे.

भोंडेव सांगतात, तीनवेळा पराभूत उमेदवाराचा आम्ही प्रचार करायचा का? आम्हाला आमच्या भागाचा विकास हवा आहे आणि त्यासाठी आम्ही एकसंध राहणं गरजेचं आहे. म्हणूनच मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला महायुतीसोबत येणं आवश्यक आहे. तसेच ते म्हणतात जर शंकरभाऊ विजया झाले आणि आम्ही दुसरीकडे आहोत, मग विकास करणं शक्य होईल का? त्यामुळे त्यांच्या प्रचारात उतरण्याचं कारण केवळ विकासच आहे.

Vidhansabha Election
Ajit Pawar: शिवतारेंच्या विरोधातील सभेला अजितदादांनी मारली दांडी, शहांना भेटण्यासाठी मुंबई गाठली! नेमकं काय घडलं ?

याशिवाय भोंडवे यांनी हेही बोलून दाखवले आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येथील महाविकास आघाडीचा उमेदवार पसंत नाही. महाविकास आघाडीकडून जर एका सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर ही वेळच आली नसती. सध्याचे उमेदवार हे आयात उमेदवार आहेत. आम्ही पक्ष प्रवेशावेळी याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चाही केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com