Chhatrapti Sambhaji Nagar News : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. मतदानाला आता कमी कालावधी उरलेला असल्याने प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचारावर जोर दिला जात आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कन्नडमधील भरसभेतच संताप व्यक्त केला. सभेला उशीर होत असल्याने खासदारांनाच त्यांनी घड्याळ दाखवत राग व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख शांत व संयमी अशी आहे. मात्र, कन्नडमधील सभेवेळी त्यांना वेळ लागत असल्याने व पुढील सभेचे नियोजन बिघडत असल्याने त्यांनी खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना वेळ दाखवत संताप व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्याच पक्षाच्या खासदारावर चिडल्याचे दिसून आले. सोमवारी मुख्यमंत्री शिंदे कन्नडमधील शिवसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारासाठी स्टेजवर आल्यानंतर भाषणाला वेळ होणार हे लक्षात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर संताप व्यक्त केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कन्नडमध्ये सभा घेतली.
या सभेसाठी वेळेचे नियोजन कसे करावे यांच्या सूचना प्रत्येक नेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुख्यमंत्री आले की सत्कार आणि त्यांचे भाषण ठेवावं असं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री कन्नडमध्ये आल्यानंतर उमेदवार संजना जाधव, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची भाषणं राहिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संदीपान भुमरे यांच्यावर घड्याळ दाखवत संताप व्यक्त केला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना पाच ते सहा सभा करायच्या होत्या. त्यामुळे कदाचित त्यांनी त्यामुळेच खासदार भुमरे यांना घडाळ्यात टायमिंग दाखवत होते.
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजना जाधव या त्यांच्या पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. हर्षवर्धन जाधव हे दोन वेळा आमदार होते. यावेळी ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.