Jitendra Bhave News: नाशिक शहरातील निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या नेत्याविरुद्ध पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. या नेत्याकडून सातत्याने शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे संबंधित नेता चांगलाच चर्चेत आहे. आता त्याची वेगळ्याच कारणाने चर्चा होत आहे.
निर्भय महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी फेसबुक लाईव्ह करून अनेकांना त्रस्त करून सोडत असत. रुग्णालय, पोलीस ठाणे अथवा शासकीय कार्यालय कोठेही जाऊन अधिकाऱ्यांशी अरेरावी करणे हे नित्याचेच झाले होते. आता मात्र ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे.
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील अशोक लेलँड कंपनीच्या महावीर व्हील्स या शोरूम मध्ये हा प्रकार घडला आहे. निर्भय महाराष्ट्र पक्षाचे जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्याचे फेसबुक लाईव्ह करून खंडणीची मागणी केली. तसेच शोरूम मधील कर्मचाऱ्यांना धमकी दिली.
निर्भय महाराष्ट्र पक्षाचे नेते जितेंद्र भावे, वाहन मालक दिगंबर पाठे आणि राजेंद्र गायधनी यांसह काही कार्यकर्ते या दुकानात गेले होते. यावेळी त्यांनी दुरुस्तीसाठी आलेल्या गाडीचे स्पेअर पार्ट्स काढून घेतले आहेत, असा आरोप केला. त्या बदल्यात अडीच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास वारंवार दुकानात येऊन फेसबुक लाईव्ह करण्यात येईल त्याद्वारे दुकानाची बदनामी करण्यात येईल आणि ग्राहकांमध्ये संस्थेची प्रतिमा मलिन करण्यात येईल, असेही धमकावण्यात आले.
यासंदर्भात दुकानातील व्यवस्थापकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यावरून निर्भय महाराष्ट्र पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध यापूर्वीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये गोंधळ घातल्याने पोलिसात गुन्हा दाखल आहे.
विविध प्रश्नांवर टोकाचे आंदोलन आणि एकेरी भाषेचा वापर करीत अधिकाऱ्यांना धमकावणे ही या पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांची कार्यशैली आहे. त्यांचे सहकारी याबाबत फेसबुक लाईव्ह करतात. त्यातून संबंधितांना धमकावल्याचा आनंद ते घेत असतात. समाज माध्यमांचा गैरवापर करून अशाप्रकारे व्यवसायिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबाबत गंभीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
--------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.