Praniti Shinde News: केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारे अत्यंत असंवेदनशील आहेत. त्यांना जनतेच्या वेदना आणि समस्यांबाबत अजिबात संवेदनशीलता नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. सबंध राज्यातील जनता संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
मस्साजोग (बीड) येथील सरपंच देशमुख यांची क्रूर हत्या झाली. या हत्येमुळे सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांची कार्यपद्धती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी टीकेचे लक्ष्य केले होते. महिलांवरील अत्याचार हा अतिशय गंभीर विषय बनला आहे. मात्र सरकार आपल्याच कार्यशैलीत मग्न आहे. हा सबंध राज्यासाठी गंभीर धोका आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. चार वर्षाच्या शालेय मुलीवर अत्याचार झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेने पूर्ण प्रयत्न केले. सबंध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांना वाटते त्यांना सत्तेचे पाठबळ आहे.
काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या विषयावर राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सध्याचे राज्यकर्ते अत्यंत अस्ववेदनशील आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीने झालेल्या या हत्याकांडाचे फोटो आणि व्हिडिओ पंधरा दिवस आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते. मात्र त्यांनी त्यावर काहीही केले नाही. यावरून या सरकारचे कार्यपद्धती लक्षात येते, अशी टीका शिंदे यांनी केली.
विरोधी पक्ष हा लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आचार्य अत्रे हे सत्ताधारी नेत्यांवरील कठोर टीकाकार होते. त्यासाठी माध्यमांचे एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होते. आज अशी कोणतीही स्थिती राहिलेली नाही. सत्ताधारी विरोधकांना आपले शत्रू समजून लागले आहेत. या वैचारिक अंतरामुळे राज्य संकटात आले आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. देशात शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाकडे केंद्रातील सरकारने दुर्लक्ष केले. त्यामध्ये सातशे शेतकऱ्यांचा बळी गेला. मात्र सरकारने त्यावर साधा खेदही व्यक्त केला नाही. याबाबत राज्यातील जनतेने वेळीच जागरूक होऊन सरकारला प्रश्न केले पाहिजे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.