Maharashtra Politics: ‘एसटी’ नंतर ‘पी़ब्लू़डी’...सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर निधी कपातीची कुऱ्हाड, मंत्र्यांनीच केली मंत्र्यांची कोंडी!

Ajit Pawar;Ajit Pawar's account created a dilemma for BJP and Eknath Shinde-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांना बिलापोटी मिळतो अवघा एक टक्का निधी
Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpg
Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: लाडकी बहीण योजनेची आर्थिक पूर्तता करता करता सरकार अडखळू लागले आहे. बहिण लाडकी मात्र अन्य सर्व आता दोडके झाले आहेत. विशेषता सार्वजनिक बांधकाम विभाग आता चांगलाच अडचणीत आला आहे.

‘एसटी’ कर्मचाऱ्यांना पगारापोटी अर्धी रक्कम देण्यावरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रताप सरनाईक आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. परिवहन मंत्री सरनाईक या संदर्भात जाहीर बोलले. त्यामुळे त्याची चर्चा झाली. मात्र अन्य बऱ्याचशा विभागांची यापेक्षाही वाईट कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpg
Praniti Shinde : "हे संकट सर्व अल्पसंख्यांकांवर येणार..."; वक्फ बिलाचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदार निधीसह विविध कामे सुशिक्षित बेरोजगार असलेले अभियंते करतात. गेल्या दोन वर्षात केलेल्या या कामांची दिले सादर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा निधी शासनाकडे मागितला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने या विभागाला मोठा शॉक दिला आहे.

Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpg
MLA Dilip Bankar : गोदावरी जलपर्णीचा प्रश्न गंभीर वळणावर, सत्ताधारी आमदारच करणार आंदोलन

सध्या एक कोटीचे बिल सादर केल्यास एक टक्का अर्थात एक लाख रुपये देण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयामुळे शासनाची कामे केलेली शेकडो बेरोजगार अभियंते सध्या मंत्रालयात गर्दी करीत आहेत. ‘एसटी’ कर्मचारी पहिले त्यानंतर आता या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर शासनाच्या खडखडाटाची कुऱ्हाड कोसळली आहे.

येथील बहुतांशी कामे आमदार निधीसह विविध विकास योजनांच्या अंतर्गत करण्यात आली आहे. बांधकाम विभागाच्या मार्फत त्याची अंमलबजावणी झाली. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांनी उधार उसनवार आणि बँकांची कर्ज घेऊन ही कामे पूर्ण केली आहेत. आता उपमुख्यमंत्री पवार यांच्या खात्याने हात वर केल्याने दुहेरी मार सहन करावा लागत आहे.

यामध्ये सर्वाधिक कुचंबना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची झाली आहे. या मंत्र्यांकडे आमदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. विशेषतः सत्ताधारी महायुतीचे घटक असलेल्या भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा दबाव आहे. शिवसेना एक ना शिंदे पक्षाने आपल्या पदाधिकाऱ्यांना विशेष नीधी मंजूर केला होता. आता ती सर्व कामे अडचणीत आली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोठी कामे आणि कंत्राटदारांनी केलेल्या कामांचीही अशीच स्थिती आहे. या कंत्राट दारांनी गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे धरले होते. नव्वद हजार कोटींची बिले अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महायुती सरकारची राजकीय आणि आर्थिक पत धोक्यात आली आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com