Congress Vs Aamshya Padavi : शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार आमश्या पाडवी यांच्या आरोपांना काँग्रेस नेते माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. त्यांनी आमश्या पाडवी यांचे अक्षरशः वस्त्रहरण केले.
शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत विधान परिषद सदस्य पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया नंदूरबार जिल्ह्यात उमटल्या. आमश्या पाडवी यांनी काँग्रेस नेते व माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी मला तडीपार करण्याचे पत्र दिले होते, असा आरोप केला होता. त्याला पाडवी यांनी उत्तर दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
के. सी. पाडवी (K. D. Padavi) म्हणाले, मी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. गेली 34 वर्षे मी राजकारणात आहे. या कालावधीत कोणाशीही माझे शत्रुत्व नाही. गेली 32 वर्षे सार्वजनिक जीवनात काम करताना मी कधीही कोणताही दावा केलेला नाही. अडीच वर्षे
मंत्री असताना मी त्यांना तडीपार करावे असे पत्र दिले, हा आरोप धादांत खोटा आहे. असे पत्र असेल तर त्यांनी दाखवावे. आमश्या पाडवी यांची कोणतीही पात्रता नाही. ते त्यांच्या मतदारसंघात दहा हजारापेक्षा अधिक मते घेऊ शकत नाहीत. मात्र, गेल्या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत गेले. त्यांनी त्यांना ताकद पुरवली. नाना तऱ्हेची मदत त्यांना झाली. त्यामुळे त्यांची मते वाढली.
के. सी. पाडवी म्हणाले, आमश्या पाडवी यांचे राजकारण आणि प्रत्येक गोष्ट फक्त पैशासाठी असते. पैसे मिळवण्यासाठी ते काहीही करतात. काहीतरी आमिष मिळाल्याशिवाय ते शिंदे गटात (Shivsena Shinde Group) जाऊ शकत नाहीत, याची सर्वसाधारण नागरिकांतदेखील चर्चा आहे. आमश्या पाडवी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनासुद्धा काम करू देत नाहीत. त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे आरोप आहेत. खुद्द त्यांच्या जावयांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी नंदूरबारसारख्या दुर्गम भागातील आमश्या पाडवी याला आमदार केले. त्यांची कोणतीही पात्रता नव्हती शपथ घेताना ते मराठीदेखील वाचू शकत नव्हते. अगदी पहिलीचे शिक्षणही त्यांचे झाले की नाही सांगता येत नाही. त्यांना आमदार करून ठाकरे यांनी एक वेगळा सामाजिक प्रयोग केला होता. आदिवासींचा सन्मान केला होता. मात्र, आमश्या पाडवी यांनी त्या सन्मानाला जागून योग्य वर्तन ठेवले नाही. पक्षाशी एकनिष्ठ न राहता गद्दारी करून त्यांनी आदिवासींचा अवमान केला, असे म्हणता येईल.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.