Nandurbar Shivsena Politics : नंदूरबार येथील ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया नंदूरबारच्या शिवसेना ठाकरे गटात उमटल्या आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी पाडवी यांचा निषेध केला आहे.
आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या वेळी त्यांनी ठाकरे गट व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व संपर्क नेत्यांनी आपल्याला सहकार्य केले नाही. त्यामुळे शिंदे गटात जावे लागत आहे, असा दावा त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाडवी यांच्या प्रतिक्रियेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena) आक्षेप घेतला आहे. पाडवी यांचा नंदूरबार Nandurbar जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व आदिवासी बांधव निषेध करीत आहेत. पाडवी यांनी पक्ष का बदलला हे सर्वश्रुत आहे. ते लपून राहिलेले नाही. त्यांची ही वृत्ती राजकारणाला लागलेला रोग आहे. पाडवी यांच्यासारख्या कृतघ्न व्यक्तीमुळे सर्वसामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे UBTShivsena गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Aamshya Padavi Joining Shivsena Eknath Shinde.
या वेळी सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी म्हणाले, 2022 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांनी एक वेगळा पायंडा पाडला. अतिशय उपेक्षित अशा नंदूरबार भागातील सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला आमदार केले. गेल्या पन्नास वर्षांत असे कधीही झालेले नाही. कोणत्याही पक्षाने आदिवासींवर एवढा विश्वास दाखवलेला नाही. असे असताना आमश्या पाडवी Amshya Padavi यांनी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून काय साध्य केले? हे सगळ्यांना माहीत आहे. थोडीही नैतिकता असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यानंतर कुठल्या पक्षात जायचे ते जावे. तेव्हा त्यांना त्यांची खरी जागा कळेल.
या वेळी जिल्हा समन्वयक दीपक गवते, महानगर प्रमुख पंडित माळी, जिल्हा उपप्रमुख गोटू पाटील, युवती सेनेच्या सहसचिव मालती वळवी, रीना पाडवी, अर्जुन मराठे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात पाडवी यांचे राजकारण व त्यांचे खरे स्वरूप उघडे करू, असे आवाहन देण्यात आले.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.