Kalicharan Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kalicharan Maharaj : राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच कालिचरण महाराजांचं मोठं विधान

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्यात मराठा आरक्षणावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. ओबीसी आरक्षण बचावाच्या पावित्र्यात आहे. धनगर, लिंगायत, कोळी, मुस्लिम समाजदेखील आरक्षणासाठी लढतो आहे. यातच कालिचरण महाराज यांनी आरक्षणावर मोठे विधान नगरमध्ये केले आहे. (Kalicharan Maharaj on Maratha Reservation)

कालिचरण महाराज हे कर्जत तालुक्यात होते. भारतीय जनता पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून कालिचरण महाराज यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कालिचरण महाराजांनी माध्यमांशी संवाद साधत आरक्षणाबाबत मोठे विधान केले. आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदू विचार सोडल्याची टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सर्व जातींचे आरक्षण रद्द करून सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण जातीला नसायला पाहिजे. आरक्षण आणि सडक्या विचारसरणीमुळे हिंदू धर्म संकटात सापडला आहे. आर्थिक निकषावर आरक्षण दिल्यास इतर सलवतीदेखील बंद केल्या पाहिजेत. जाती, पंथ यांना मूठमाती देऊन सर्व समाज हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आजही मुस्लिम समाजाची व्हाेट बँक आहे. परंतु हिंदू सर्व विखुरलेला आहे. यातूनच हिंदू धर्मीयांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जात ही हद्दपार करावी. केवळ हिंदू एवढाच उल्लेख ठेवावा. तसे झाल्यास देश सुजलाम् सुफलाम् होईल," असेही कालिचरण महाराज यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हिंदू विचारांवरदेखील कालिचरण महाराज यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदू विचार सोडले आहेत. हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही कालिचरण महाराज यांनी म्हटले. या वेळी त्यांनी ग्रामदैवत गोदड महाराज यांचे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष शेखर खरमारे, पप्पू धोदाड, गणेश पालवे आदी उपस्थित होते.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT