Kalpana Chumbhale News: माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या समर्थक संचालकांमध्ये फूट पडली. भाजपचे शिवाजीराव चुंभळे यांनी हे राजकारण घडवले. आता या दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे
नाशिक बाजार समितीच्या सभापती भाजपच्या कल्पना चुंभळे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर तोफ डागली आहे. माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. कोटी आणि लाखांच्या आकड्यातील हे आरोप त्यांनी पिंगळे यांच्यावर फेकले आहेत.
बाजार समितीत सत्तांतर झाल्यावर मोठा आर्थिक व्यवहार करून संचालकांना फोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते देविदास पिंगळे यांनी केला होता. यातील काही संचालकांना बाजार समितीवर २०० कोटींचे कर्ज काढून गैरव्यवहार करायचा होता. त्याला विरोध केल्याने आपल्या विरोधात अविश्वास आल्याचे पिंगळे म्हणाले होते.
आता नवनिर्वाचित सभापती कल्पना चुंबळे यांनी पिंगळे यांनी बाजार समितीला भ्रष्टाचाराचे कुरण केले होते, असा आरोप केला आहे. बाजार समितीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला ५३.६० लाख रुपये देण्यात आले. खड्डे बुजविण्यासाठी २१.४६ लाख रुपये खर्च झाला. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत घोळ आहे.
पंचवटीतील बाजार समितीच्या आवारात कंत्राटदाऱ्याला दुरुस्ती व अन्य कामांसाठी ८७.५० लाख रुपये आगाऊ देण्यात आले. एकंदर या कामासाठी २.७८ कोटी रुपये खर्च झाले लाख रुपये वसुली अद्याप बाकी आहे. अशाप्रकारे विविध लाखांच्या आणि कोटींच्या कामाच्या रकमा त्यांनी सांगितल्या.
यात नेमकं काय घोटाळा झाला?, भ्रष्टाचार काय आहे? त्यावर नवे संचालक मंडळ काय कारवाई करणार आहे? यावरून राजकारण रंगले आहे. यावेळी शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, जगदीश अपसुंदे हे संचालक देखील उपस्थित होते.
नाशिक बाजार समितीच्या कामकाजात विविध कामांवर अवधव्य खर्च झाला, असा एकंदर नव्या सभापतींचा निष्कर्ष आहे. या निमित्ताने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. असा दावा श्रीमती चुंभळे यांनी केला. एकंदरच सत्तांतरानंतर माजी खासदार पिंगळे आणि सभापती चुंबळे गटात सुडाच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू झाला आहे असे चित्र आहे.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.