
Maharashtra Politics : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, आमच्यातली भांडणं खूप छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते असे म्हटले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं असून राजकीय वर्तुळात त्या विधानाची चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोघांची काय मतं आहेत? याची मला कल्पना नाही. मात्र दोघांनी एकत्र यायला हवे अशी अनेकांची इच्छा आहे.
2014 मध्ये त्यांना एकत्र येण्याची संधी चालून आली होती. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत. दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल असं भुजबळांनी म्हटलं आहे.
भुजबळ पुढे म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने सर्वांनाच राज ठाकरे यांची उपयुक्तता वाटत आहे. प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिणेकडे सगळीकडे प्रादेशिक पक्ष हवेत. राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत जातात. जेवण करतात आणि नंतर सांगतात भोजनावर चर्चा झाली. माझा त्यावर विश्वास नाही, राजकीय चर्चा होतच असते. प्रादेशिक पक्षाचे सरकार बनवितात. दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान ठाकरे बंधू यांच्यानंतर पवार काका-पुतणे एकत्र येतील का? असाही प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, सगळी कुटूंब एकत्र आली तर सर्वांना आनंद होतो, सर्वांनी एकत्र यावे. राजकारणामुळे जे जे कुटूंब फुटले, त्यांनी एकत्र आले तर आनंदच होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.