Madhi Yatra News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Madhi Yatra News : मढी यात्रेत गोंधळ? वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप; पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल, थेट DySPकडे तक्रार

Kanifnath Yatra at Madhi in Pathardi, PI Vilas Pujari allegedly broke the windows of vehicles with sticks during security duty; complaint has been filed with the Deputy Superintendent of Police : पाथर्डी इथल्या मढी यात्रेत वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी काही वाहनांच्या काचा फोडल्याचा प्रकार केला आहे.

Pradeep Pendhare

Pathardi Kanifnath Yatra news : राहुरी इथं पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रकारानं अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ उडाली असतानाच, पाथर्डी इथून पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी माहिती समोर आली आहे.

श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेदरम्यान, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी बंदोबस्तावर असताना, वाहतुकीचे नियोजन करताना, काही वाहनांवर काठ्या मारून, काचा फोडून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. या दिवशी पाथर्डीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक नियोजनासाठी पोलिस (Police) निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. पण याचवेळी विलास पुजारी यांनी वाहतुकीमध्ये अडकलेल्या वाहनांवर काठी मारून, त्यांचं नुकसान केलं.

विलास पुजारी वाहनांवर काठी मारून करत असलेल्या नुकसानीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. असे असतानाच. छत्रपती संभाजीनगरमधील अभियंता नीलेश बाबुराव शिंदे यांनी याबाबत शेवगाव विभागाचे उपअधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

8 मार्चला, नीलेश हे सकाळी आपल्या आई पद्मा शिंदे यांच्यासह तिसगाव इथं नातेवाईकांच्या लग्नासाठी आपल्या वाहनातून आले होते. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या तिसगाव–पाथर्डी रोडवर अशोक लॉन्स परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी रागाच्या भरात वाहनांच्या काचा फोडत होते.

वाहनावर काठी मारून नुकसान

विलास पुजारी यांनी शिंदे यांच्या वाहनाची देखील काच फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र काच खाली असल्याने ती फुटली नाही. त्यानंतर पुजारी यांनी काठीने वाहनाच्या उजव्या बाजूच्या दरवाजावर मारून नुकसान केले. शिंदे यांनी याबाबत उपअधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

तक्रारदाराच्या आईला शिवीगाळ करत मारहाण

शिंदे यांनी याबाबत विचारणा केल्यावर पुजारी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तसंच शिंदे यांच्या आई पद्मा शिंदे या वाहनातून खाली उतरल्या असता, त्यांनाही शिवीगाळ करून काठीने पायावर मारहाण केली, असेही तक्रारीत म्हटलं आहे.

तक्रारीवर कारवाई होणार का?

शिंदे यांनी उपअधीक्षकांकडे तक्रार करत, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, मढी यात्रेदरम्यान घडलेल्या या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने नाथभक्त आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाकडून शिंदे यांच्या तक्रारीची चौकशी होऊन, नेमकी काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT